Breaking: ओमायक्रॉनला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेचा अ‍ॅक्शन प्लॅन

महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी अ‍ॅक्शन प्लॉन तयार केला आहे.
Breaking: ओमायक्रॉनला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेचा अ‍ॅक्शन प्लॉन
Breaking: ओमायक्रॉनला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेचा अ‍ॅक्शन प्लॉन - Saam Tv

मुंबई : ओमायक्रॉनला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने अ‍ॅक्शन प्लॅन बनवला आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबई महापालिकेने पाच सूत्री अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे. धोकादायक देशामधून येणाऱ्या प्रवाशांवर महापालिका बारीक नजर ठेवणार आहे. महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी अ‍ॅक्शन प्लॉन तयार केला आहे.

काय आहे अ‍ॅक्शन प्लॅन?

* विमानतळ सीईओंकडून हाय- रिस्क आणि रिस्क देशातून येणाऱ्या प्रवाशांची यादी आपात्कालीन कक्षाला पाठवली जाणार.

* प्रवाशांची यादी सोपी व्हावी यासाठी सॉफ्टवेअरची निर्मिती होणार.

* आपात्कालीन कक्षाकडून मुंबई महापालिकेच्या 24 वॉर्डातील वॉर रूमला प्रवाशांच्या पत्तासह पाठवली जाणार.

Breaking: ओमायक्रॉनला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेचा अ‍ॅक्शन प्लॉन
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात १२० कोटींचा घोटाळा

* वॉर रूममधून प्रवाशांची सतत 7 दिवस संपर्क ठेवण्यात येणार.

* विलगीकरणाचे नियम प्रवासी नीट पाळत आहे की नाही यांची खबरदारी घेतली जाणार.

* वॉर रूम वॉर्डात 10 रुग्णवाहिका तयार ठेवाणार.

* महापालिकेची पथकही बनवली जाणार.

* महापालिकेची पथकं प्रवाशांच्या घरी जावून देखील तपासणी करणार.

* प्रवासी राहत असलेल्या सोसायटीला पत्र दिलं जाणार

* प्रवासी विलगीकरणाचे नियम पाळतो की नाही हे पाहण्यासाठी पत्र दिलं जाणार.

दरम्यान राज्यात ओमायक्रॉनचे २८ संशयीत रुग्ण त्यांचा अहवाल जिनोम सिक्केंगसिंगसाठी पाठवण्यात आला आहे, त्यामुळे त्यांच्यातला कोणाला ओमायक्रॉनची लाागण झाली आहे का? याची प्रशासन चौकशी करत आहेत. राज्यात कर्नाटकात ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळले आहेत. अन्य देशातून ओमायक्रॉन थैमान घातले आहे. त्यामुळे भारतात हा व्हेरियंट आपले पाय पसरतो का? हे येणार काळ सांगेल.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com