IND vs NZ: 'हे' खेळाडू करु शकतात आज भारतीय संघात पदार्पण

भारतीय संघ (Team India) आपल्या मालिकेतील शेवटचा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळणार आहे.
IND vs NZ: 'हे' खेळाडू करु शकतात आज भारतीय संघात पदार्पण
IND vs NZ: 'हे' खेळाडू करु शकतात आज भारतीय संघात पदार्पणTwitter

IND vs NZ 3rd T20 : भारतीय संघ (Team India) आपल्या मालिकेतील शेवटचा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळणार आहे. भारतीय संघाचे लक्ष न्यूझीलंडला टी-20 मालिकेत व्हाईट वॅश देण्याचे असणार आहे, परंतु भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) एका वेगळ्या निर्णयाच्या तयारीत आहेत. अशा प्रकारे दोन खेळाडू आज भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकतो.

IND vs NZ: 'हे' खेळाडू करु शकतात आज भारतीय संघात पदार्पण
रोहितनं एकाच सामन्यात मोडला दोन दिग्गजांचा रेकॉर्ड; बनला 'सिक्सर किंग'

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाच्या निवडकर्त्यांनी 16 खेळाडूंची निवड केली होती. यापैकी 12 खेळाडू मैदानावर या मालिकेचा भाग बनले आहेत, तर ऋतुराज गायकवाड, इशान किशन, युझवेंद्र चहल आणि आवेश खान हे अजूनही मैदानावर जायची वाट पाहत आहेत. या चार खेळाडूंना न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात संधी मिळू शकते, असे मानले जात आहे. रोहित शर्मा आणि राहुल द्रविड या खेळाडूंना संधी देण्याच्या तयारीत आहेत, कारण रोहित आणि राहूल दोघेही तरुणांना संधी देतात.

IND vs NZ: 'हे' खेळाडू करु शकतात आज भारतीय संघात पदार्पण
तूर, ज्वारीवर अळीचा प्रादुर्भाव; रब्बी हंगामातही शेतकरी चिंतेत

तसे झाल्यास आवेश खान, ऋतुराज गायकवाड भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण करू शकतो. या मालिकेत हर्षल पटेललाही भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. शेवटच्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भुवनेश्वर कुमारच्या जागी आवेश खानला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. या सामन्यात भुवनेश्वर कुमार किंवा दीपक चहरला विश्रांती दिली जाऊ शकते. या स्थितीत आवेश खान टीम इंडियाकडून खेळताना दिसू शकतो.

इंदौर, मध्य प्रदेश येथे जन्मलेला, उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आवेश खान सातत्याने 140 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करू शकतो. आतापर्यंत त्याने आयपीएलमध्ये 25 सामने खेळले आहेत. 2017 मध्ये त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच आरसीबीकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली. 2014 मध्ये त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 27 सामने, लिस्ट ए क्रिकेटमध्ये 16 आणि टी-20 क्रिकेटमध्ये 48 सामने खेळले असून, त्याने अनुक्रमे 100, 10 आणि 65 बळी घेतले आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com