पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर विराटची बॅट चांगलीच तळपली. बांगलादेशने दिलेल्या २५७ धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीने ६ चौकार आणि ४ गगनचुंबी षटकारांच्या मदतीने नाबाद १०३ धावांची खेळी केली.
या खेळीच्या जोरावर त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. हा पुरस्कार स्विकारल्यानंतर विराटने आपल्याच संघातील सहखेळाडू रविंद्र जडेजाची माफी मागितली आहे.
हा सामना झाल्यानंतर विराटची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. या पुरस्काराचा स्विकार केल्यानंतर विराट कोहली म्हणाला की, 'जडेजाकडून हा पुरस्कार हिसकावून घेतल्याबद्दल मी त्याची माफी मागतो. मला काहीतरी मोठं करायचं होतं. वर्ल्डकप स्पर्धेत माझ्या नावे काही अर्धशतकांची नोंद होती. मात्र त्या अर्धशतकांचं रुपांतर मी मोठ्या खेळीत करू शकलो नव्हतो.' विराटने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर त्याची सामनावीर म्हणून निवड केली गेली तर रविंद्र जडेजाने देखील गोलंदाजी करताना १० षटकात अवघ्या ३८ धावा खर्च करत २ गडी बाद केले होते.
सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा
खेळपट्टीबाबत बोलताना विराट कोहली म्हणाला की,' खेळपट्टी उत्तम होती. मला माझा नैसर्गिक खेळ खेळण्याची संधी मिळाली. केवळ चेंडू टाईम केला, गॅप शोधले, जोरात धावलो आणि गरज पडली तेव्हा चौकारही मारले.' (Latest sports updates)
रविंद्र जडेजाची दमदार गोलंदाजी..
रविंद्र जडेजा हा भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज आहे. भारतीय संघाला जेव्हा जेव्हा विकेटची गरज असते त्यावेळी तो विकेट काढून देतो.या सामन्यातही त्याने अर्धशतकी खेळी करणाऱ्या लिटन दासला बाद करत माघारी धाडले.
बांगलादेशचा कर्णधार शांतोला देखील त्याने ८ धावांवर बाद करत माघारी धाडले. या डावात त्याने ३८ धावा खर्च करत २ गडी बाद केले. या गोलंदाजीच्या बळावर बांगलादेशला ५० षटकअखेर केवळ २५६ धावा करता आल्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने ७ गडी राखून विजय मिळवला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.