IND vs BAN, 1st Inning: अँटिग्वामध्ये पंड्या शो! हार्दिकचा अर्धशतकी तडाखा; बांगलादेशसमोर जिंकण्यासाठी डोंगराइतकं आव्हान

India vs Bangladesh, Live Updates: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाने मोठं आव्हान उभारलं आहे.
IND vs BAN, 1st Inning: अँटिग्वामध्ये पंड्या शो! हार्दिकचा अर्धशतकी तडाखा; बांगलादेशसमोर जिंकण्यासाठी डोंगराइतकं आव्हान
hardik pandyatwitter

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील ४७ वा सामना भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. हा सामना अँटिग्वातील सर विवियन रिचर्ड्स स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात बांगलादेशच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकला आणि भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. दरम्यान भारतीय फलंदाजांनी बांगलादेशच्या गोलंदाजांची धुलाई करत संघाची धावसंख्या १९६ धावांवर पोहोचवली आहे. बांगलादेशला हा सामना जिंकण्यासाठी १९७ धावांची गरज आहे.

या सामन्यात भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची जोडी मैदानावर आली होती. रोहित शर्माने आक्रमक सुरुवात करुन दिली. मात्र तो २३ धावांवर माघारी परतला. रोहितनंतर विराटने मोर्चा सांभाळला. त्याला चांगली सुरुवातही मिळाली होती. तो ३७ धावा करत माघारी परतला. विराट कोहली बाद झाल्यानंतर रिषभ पंतवर मोठी जबाबदारी होती. त्याने २४ चेंडूंचा सामना करत ३६ धावा केल्या आणि भारतीय संघाला सामन्यात कमबॅक करुन दिलं.

IND vs BAN, 1st Inning: अँटिग्वामध्ये पंड्या शो! हार्दिकचा अर्धशतकी तडाखा; बांगलादेशसमोर जिंकण्यासाठी डोंगराइतकं आव्हान
IND vs BAN, Pitch Report: टॉस ठरणार बॉस! बांगलादेशला हरवण्यासाठी टीम इंडियाने आधी काय करावं?

शेवटी शिवम दुबे आणि हार्दिक पंड्या शो पाहायला मिळाला. शिवम दुबेला मोठे फटके खेळण्यासाठी संघात स्थान दिलं गेलं आहे. त्याने ते करुनही दाखवलं. दुबेने २४ चेंडूंचा सामना करत ३ षटकार खेचत ३४ धावा केल्या. शेवटी हार्दिक पंड्या शो पाहायला मिळाला. हार्दिकने २७ चेंडूंचा सामना करत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या साहाय्याने नाबाद ५० धावांची खेळी केली आणि संघाची धावसंख्या १९५ धावांवर पोहोचवली.

IND vs BAN, 1st Inning: अँटिग्वामध्ये पंड्या शो! हार्दिकचा अर्धशतकी तडाखा; बांगलादेशसमोर जिंकण्यासाठी डोंगराइतकं आव्हान
IND vs BAN, Playing XI: संधी मिळूनही ठरतोय फ्लॉप; रोहित या खेळाडूला बसवणार? अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग ११

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com