Ind Vs Aus 3RD ODI: पाच चेंडू शिल्लक असताना भारत ऑलआऊट! 21 धावांनी पराभव; सामन्यासह मालिकाही गमावली

Ind vs Aus ODI series: ऑस्ट्रेलियाने भारताचा 21 धावांनी पराभव केला. पाच चेंडू शिल्लक असताना भारताचा अख्खा संघ बाद झाला.
India vs Australia ODI Match
India vs Australia ODI Matchsaam tv
Published On

India vs Australia ODI Match: चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय (Ind Vs Aus ODI) सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 21 धावांनी पराभव केला. पाच चेंडू शिल्लक असताना भारताचा अख्खा संघ बाद झाला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 2-1 अशी जिंकली आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकूनप्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांनी 3-3 विकेट्स घेऊवन ऑस्ट्रेलियाचा धावफलक काही वेळ थांबवला होता. मात्र शेवटच्या काही षटकात ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करत 49 षटकात सर्वबाद 269 धावा केल्या.

India vs Australia ODI Match
Video: कुलदीप यादवची जादूई फिरकी, नेमकं काय झालं ते बॅट्समनला कळलंच नाही; व्हिडिओ पाहाच

प्रत्युत्तरात भारताने दमदार सुरुवात केली. मात्र रोहित शर्मा आणि शुभमन गिल बाद झाल्यानंतर भारताच्या एकामागोमाग विकेट पडत राहिल्या. केएल राहुल आणि विराट कोहली ही जोडी खेळपट्टीवर दमदार खेळ दाखवत होती. परंतु राहुल आऊट झाला आणि सामना उलटला. यानंतर सातत्याने विकेट पडत राहिल्या.

India vs Australia ODI Match
IPL 2023: हे नियम माहीत नसतील तर आयपीएल पाहायला बसूच नका; यंदा आयपीएलमध्ये दिसणार चार निराळे नियम..

अखेरीस हार्दिक पांड्या आणि जडेजाने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय संघ 49.1 षटकात 248 धावांवर सर्वबाद झाला आणि टीम इंडियाला 21 धावांनी पराभव स्विकारावा लागला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com