ICC Under 19 World Cup : 17 बॉलमध्येच सामना संपवला, वर्ल्डकपमध्ये भारताच्या पोरींनी इतिहास रचला

Ind WU-19 Vs Mas WU-19 : भारतीय संघाने टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 14 ओव्हर्समध्ये मलेशियाला फक्त 31 धावा करता आल्या. पुढे भारताने फक्त 17 बॉलमध्ये सामना जिंकत इतिहास रचला.
ICC Under 19 World Cup Ind WU-19 Vs Mas WU-19
ICC Under 19 World Cup Ind WU-19 Vs Mas WU-19ICC
Published On

ICC Under 19 World Cup : आयसीसी अंडर 19 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाच्या पोरींनी इतिहास रचला आहे. भारत वि. मलेशिया या सामन्यामध्ये भारतीय संघाने फक्त 17 बॉलमध्ये मलेशियाचा पराभव केला आहे. मलेशियाचा संघ 31 धावांवर ऑल आऊट झाला. पुढे भारतीय महिला फलंदाजांनी फक्त 2.5 ओव्हर्समध्ये सामना जिंकला.

भारतीय महिला संघासाठी अंडर 19 वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत भारताने दोन सामने खेळले आहेत. पहिल्या सामन्यात भारताने 9 विकेट्सने वेस्ट इंडिजचा पराभव केला होता. आता दुसऱ्या सामन्याने संघाने 17 बॉलमध्ये मलेशियाला ऑल आऊट करुन दुसरा विजय मिळवला आहे. या विजयामुळे ग्रुप स्टेजच्या यादीत भारत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.

सामन्यात भारताने टॉस जिंकला आणि फिल्डींग करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या ओव्हरमध्ये मलेशियाला पहिला धक्का मिळाला. त्यानंतर 14 व्या ओव्हरपर्यंत संघातील सर्व खेळाडू बाद झाले. भारतीय संघातील स्टार फिरकीपटू वैष्णवी शर्माने तर कमालच केली. तिने फक्त 5 धावा देत 5 गडी बाद केले. यात तिने 14 व्या ओव्हरमध्ये घेतलेल्या हॅट्रिकचा देखील समावेश आहे.

ICC Under 19 World Cup Ind WU-19 Vs Mas WU-19
Ranji Match In Nashik: ऋतुराज- पंड्या नाशिकमध्ये खेळणार! कधी, कुठे अन् केव्हा पाहता येणार सामना?

मलेशियाने संपूर्ण सामन्यात फक्त 31 धावा केल्या. फलंदाजीला उतरल्यानंतर भारतीय संघातील सलामीवीरांनी फक्त 17 बॉलमध्ये 32 धावा केल्या. मलेशियाच्या संघातील गोलंदाजांना एकाही बाद करता आले नाही. मलेशियानंतर भारतीय अंडर 19 महिला टीम 23 जानेवारीला श्रीलंकेचा सामना करणार आहे.

ICC Under 19 World Cup Ind WU-19 Vs Mas WU-19
IND vs ENG, Weather Update: भारत- इंग्लंड पहिला सामना रद्द होणार? काय आहे कारण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com