ICC नं महिला विश्वचषक 2022 चा संघ केला जाहीर; एकही भारतीय नाही

आफ्रिकेला उपांत्य फेरीत पोहोचवण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या 22 वर्षीय खेळाडूने जिनं पाच अर्धशतके झळकावली तिचाही संघात समावेश करण्यात आला आहे.
Meg Lanning
Meg LanningSaam TV
Published On

आयसीसीने महिला विश्वचषक 2022 च्या संघाची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंगला (Meg Lanning) ICC महिला क्रिकेट विश्वचषक (2022 Most Valuable Team of the ICC Women’s) च्या मोस्ट व्हॅल्युएबल टीमची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. तिने आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देत या विश्वचषकात 394 धावा केल्या आहेत. चार ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी या संघात स्थान मिळवले आहे, ज्यात प्लेअर ऑफ टुर्नामेंट ठरलेली अॅलिसा हिलीचा समावेश आहे. यष्टीरक्षक मेग ने विश्वचषकात दोन शतके झळकावली आहेत. त्यात अंतीम सामन्यातील 170 धावांचा समावेश आहे. ज्याच्या बळावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर मोठी धावसंख्या उभी केली होती.

संघाची निवड आयसीसीच्या ख्रिस टेटली यांनी बोलावलेल्या एका पॅनेलद्वारे करण्यात आली होती, ज्यामध्ये समालोचक लिसा स्थळेकर, नासेर हुसेन आणि नताली जर्मनोस आणि पत्रकार आलोक गुप्ता आणि क्रिस्टी हॅविल या पॅनेलचे इतर सदस्य होते. रॅचेल हेन्स इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 130 धावांसह 497 धावा करणारी दुसरी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली तिचाही संघात समावेश करण्यात आला आहे. हेन्स सोबतच ऑस्ट्रेलियाची अॅश्ले हिल्सचाही संघात समावेश करण्यात आला आहे.

Meg Lanning
IPL 2022: इतिहासात पहिल्यांदाच चेन्नईच्या संघानं केला खराब विक्रम...

आफ्रिकेला उपांत्य फेरीत पोहोचवण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या 22 वर्षीय खेळाडूने जिनं पाच अर्धशतके झळकावली तिचाही संघात समावेश करण्यात आला आहे. अष्टपैलू नॅट सायव्हरचाही संघात समावेश करण्यात आला आहे. जिने अंतिम सामन्यात नाबाद 148 धावा केल्या तर चार विकेट्ससह संपुर्ण सामन्यात 436 धावा करून इंग्लंडच्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली आहे. या प्लेईंग-11 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे. भारताच्या दृष्टीने महत्त्वाचं म्हणजे या प्लेईंग-११ मध्ये एकही भारतीय खेळाडू नाही. भारताच्या महिला संघात एवढे चांगले खेळाडू असतानाही कोणाचाच यामध्ये समावेश करण्यात आलेला नाही.

Most Valuable Team:

लॉरा वोल्वार्ड (दक्षिण आफ्रिका), अलिसा हिली (ऑस्ट्रेलिया), मेग लॅनिंग (कॅप्टन) (ऑस्ट्रेलिया), रॅचेल हेन्स (ऑस्ट्रेलिया), नॅट सायव्हर (इंग्लंड), बेथ मुनी (ऑस्ट्रेलिया), हेली मॅथ्यूज (वेस्ट इंडिज), मारिझान कॅप (दक्षिण आफ्रिका), सोफी एक्लेस्टोन (इंग्लंड), शबनिम इस्माईल (दक्षिण आफ्रिका), सलमा खातून (बांगलादेश), १२वा खेळाडू: चार्ली डीन (इंग्लंड)

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com