GT vs PBKS, Toss Update: पंजाबचा नाणेफेक जिंकत बॉलिंगचा निर्णय! दोन्ही संघांच्या प्लेइंग ११ मध्ये विस्फोटक फलंदाजांची एन्ट्री

Gujarat Titans vs Punjab Kings, IPL 2024: आयपीएल २०२४ स्पर्धेतील १७ वा सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे.
shikhar dhawan with shubman gill
GT vs PBKS, IPL 2024 Gujarat titans vs punjab kings toss update and playing XI update cricket news in marathi amd2000twitter
Published On

Gujarat Titans vs Punjab Kings, Toss Update:

आयपीएल २०२४ स्पर्धेतील १७ वा सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या सामन्यासाठी कशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११? जाणून घ्या.

नाणेफेक जिंकल्यानंतर शिखर धवन म्हणाला की, 'आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. मला असं वाटतं की, खेळपट्टी खूप चांगली आहे आणि शेवटपर्यंत अशीच राहील. आम्ही धावांचा पाठलाग करण्याला प्राधान्य देतोय. आम्ही सध्या चांगलं क्रिकेट खेळतोय. लिव्ही बाहेर जातोय आणि सिकंदर रझा प्लेइंग ११ मध्ये येतोय.' या सामन्यासाठी पंजाब किंग्ज संघात १ बदल करण्यात आला आहे. लियाम लिव्हिंगस्टनऐवजी सिंकदर रझाला संघात स्थान दिलं गेलं आहे.

shikhar dhawan with shubman gill
IPL 2024 Point Table: कोलकाताच्या विजयानंतर पॉईंटटेबलमध्ये मोठा उलटफेर, KKRची पहिल्या स्थानावर झेप

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११...

पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन):

शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), प्रभसिमरन सिंग, सॅम करन, शशांक सिंग, सिकंदर रझा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग

shikhar dhawan with shubman gill
Shah Rukh Khan सोबत IPL चा सामना का पाहत नाही Juhi Chawla?, स्वत:च केला खुलासा

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन):

वृद्धिमान साहा, शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, केन विल्यमसन, विजय शंकर, अजमतुल्ला उमरझाई, राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, उमेश यादव, दर्शन नळकांडे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com