PNG vs Oman: इतिहास घडला! युगांडाच्या ४३ वर्षीय गोलंदाजाने मोडला टी-२० क्रिकेटमधील सर्वात मोठा रेकॉर्ड

Frank Nsubuga Record News: या सामन्यात युगांडाच्या ४३ वर्षीय फ्रँक न्सुबुगाने टी-२० क्रिकेटमधील एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
PNG vs Oman: इतिहास घडला! युगांडाच्या ४३ वर्षीय गोलंदाजाने मोडला टी-२० क्रिकेटमधील सर्वात मोठा रेकॉर्ड
Frank Nsubugatwitter

आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील ९ व्या सामन्यात युगांडा आणि पापुआ न्यू गिनी हे दोन्ही संघ आमन सामने येणार आहेत. या सामन्यात पापुआ न्यू गिनीला ३ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात पापुआ न्यू गिनीचा संपूर्ण डाव अवघ्या ७७ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करताना युगांडाने १० चेंडू शिल्लक ठेवून हा सामना जिंकला. दरम्यान या सामन्यात युगांडाच्या ४३ वर्षीय फ्रँक न्सुबुगाने एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

या सामन्यात युगांडाचा गोलंदाज फ्रँक न्सुबुगाने ४ षटकं टाकली. यादरम्यान त्याने अवघ्या ४ धावा खर्च करत २ गडी बाद केले. यासह तो टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात बेस्ट इकोनॉमिकल स्पेल टाकणारा गोलंदाज ठरला आहे. याबाबतीत त्याने दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खियाला मागे सोडलं आहे.

PNG vs Oman: इतिहास घडला! युगांडाच्या ४३ वर्षीय गोलंदाजाने मोडला टी-२० क्रिकेटमधील सर्वात मोठा रेकॉर्ड
IND vs PAK, Playing XI: पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत टीम इंडियाची प्लेइंग ११ बदलणार; या खेळाडूचं होणार कमबॅक

टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत इकोनॉमिकल गोलंदाजी करणारे गोलंदाज

३/४ - फ्रँक न्सुबुगा (युगांडा) विरुद्ध पापुआ न्यू गिनी, गयाना, २०२४

४/७ - एनरिक नॉर्खिया (दक्षिण आफ्रिका) विरुद्ध श्रीलंका, न्यूयॉर्क, २०२४

६/८ - अजंता मेंडिस (श्रीलंका) विरुद्ध झिम्बाब्वे, हंबनटोटा, २०१२

१/८ - महमूदुल्लाह (बांगलादेश) विरुद्ध अफगाणिस्तान, मीरपुर, २०१४

३/८ - वानिंदु हसरंगा (श्रीलंका) विरुद्ध युएई, जिलॉन्ग, २०२२

PNG vs Oman: इतिहास घडला! युगांडाच्या ४३ वर्षीय गोलंदाजाने मोडला टी-२० क्रिकेटमधील सर्वात मोठा रेकॉर्ड
IND vs PAK: भारत- पाक सामन्याआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! समोर आलं मोठं कारण

युगांडाचा ऐतिहासिक विजय

या सामन्यात दोन्ही संघातील गोलंदाज चमकले. या सामन्यात युगांडाकडून गोलंदाजी करताना कॉस्मॉस कयवुता, जुमा मियागी, अल्पेश रमजामी आणि फ्रँक न्सुसुबाने प्रत्येकी २-२ गडी बाद केले. तर पापुआ न्यू गिनी संघातील गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं, तर या संघाकडून गोलंदाजी करताना अली नाओ आणि नार्मन वानुआने प्रत्येकी २-२ गडी बाद केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com