देशात कोरोनाची चौथी लाट 'या' तारखेपासून; IIT च्या संशोधनात खुलासा

डब्ल्यूएचओने म्हटले आहे की मे-जूनपर्यंत व्हायरसच्या पॅटर्नवर लक्ष ठेवावे लागेल. काही विशेष काही आढळले नाही तर ही आजार स्थानीक घोषित केला जाईल.
Corona
CoronaSaam TV
Published On

कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) आता ओसरत आहे. कोरोना नियमांमध्ये बऱ्याच प्रमाणात शिथीलत दिली जात आहे. परंतु आता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) कानपूरच्या संशोधकांनी एका अभ्यासात केला आहे. त्या अभ्यासात ते म्हटले आहेत की भारतात कोरोना विषाणू संसर्गाची चौथी लाट 22 जूनच्या आसपास येऊ शकते. आणि ऑगस्टच्या मध्यापासून ती पिकवरती जाऊ शकते. हा अभ्यास नुकताच MedRive जर्नलमध्ये प्रकाशित झाला असून त्याचे निष्कर्ष येणे बाकी आहेत.

संशोधकांनी सांख्यिकीय मॉडेल्सच्या आधारे हा अंदाज लावला असून त्यानुसार संभाव्य चौथी लाट सुमारे चार महिने टिकेल. IIT कानपूरच्या गणित आणि सांख्यिकी विभागाचे सबरा प्रसाद राजेशभाई, सुभ्रा शंकर धर आणि शलभ यांच्या नेतृत्वाखालील अभ्यासात असे सुचवण्यात आले आहे की, चौथ्या लाटेची तीव्रता कोरोना विषाणूच्या (Coronavirus) नवीन संभाव्य स्वरूपावर आणि लसीकरणाच्या स्थितीवर अवलंबून असेल.

Corona
भक्तानं काशी विश्वनाथ मंदीराला दिले 37 किलो सोने, कारण मोदींच्या...

अभ्यासकांच्या मते, “डेटा दर्शवितो की भारतात संसर्गाची चौथी लाट अगोदरच्या लाटांचा अभ्यास केला असता 936 दिवसांत येईल. चौथी लाट २२ जून २०२२ पासून सुरू होईल आणि २३ ऑगस्ट २०२२ पर्यंत शिखर गाठेल आणि २४ ऑक्टोबर २०२२ पर्यंत संपेल. तथापि, संशोधकांनी सांगितले की संभाव्य नवीन पॅटर्नचा एकूण मूल्यांकनावर खोलवर परिणाम होण्याची शक्यता नेहमीच असते. लाटेचा परिणाम हा कोरोना संसर्गाच्या प्रकारावर अवलंबून असेल.

जागतिक आरोग्य संघटनेनेही दिला इशारा

लेखकांच्या मते, " यासर्वांबरोबरच चौथ्या लाटेचा परिणाम हा लसीकरणावरती अवलंबून असेल, कारण ज्यांनी लसीचे तिन्ही डोस घेतले असतील त्यांना संसर्ग होणार नाही किंवा त्रास कमी प्रमाणात होईल. WHO नेही जाहीर केले आहे की ओमिक्रॉन हा कोरोनाचा अंतिम प्रकार नसणार आहे. यानंतरही कोरोनाचे प्रकार येत राहतील.''

व्हायरसच्या पॅटर्नवर लक्ष ठेवले जाईल

डब्ल्यूएचओने म्हटले आहे की मे-जूनपर्यंत व्हायरसच्या पॅटर्नवर लक्ष ठेवावे लागेल. काही विशेष काही आढळले नाही तर ही आजार स्थानीक घोषित केला जाईल. Omicron चा BA.2 प्रकार देखील कोणतीही नवीन लहर आणणार नाही. चौथ्या लहरीचा प्रकार हा मलेरिया किंवा चिकुनगुनियासारखा असू शकतो. म्हणजे एका भागात काही दिवस प्रभाव पडेल आणि मग सर्व काही ठीक होईल.

डब्ल्यूएचओने सांगितले की, आपण त्याच्यासोबत जगायला शिकले पाहिजे. बरेच नियम बदलावे लागतील. कोरोना विषाणू कोणत्याही गोष्टीला स्पर्श करून पसरत नाही. याची शक्यता खूपच कमी आहे. दर पाच मिनिटांनी हात स्वच्छ करण्याचीही गरज नाही. गर्दीच्या बंद ठिकाणी, ट्रेन-बसमध्ये मास्क घाला. फक्त कोरोना नियमांची काळजी घ्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com