INDvsSL: श्रीलंका क्रिकेट संघात (Shri Lanka Cricket Team) नक्कीच काहीतरी समस्या आहेत. श्रीलंकेच्या पाच क्रिकेटपटूंना राष्ट्रीय शिबिरातून वगळण्यात आलेले आहे. भारता विरुद्धच्या टी-20 (IND vs SL T-20) मालिकेसाठी दंबुला आणि कोलंबोमधील बायो-बबल्समध्ये हे खेळाडू हजर नसल्याचे वृत्त आहे. यामागील कारण म्हणजे पाच क्रिकेटर्सनी श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या करारावर सही करण्यास नकार दिला आहे.
लसिथ एम्बुल्डेनिया, विश्व फर्नांडो, लाहिरू कुमारा, अॅशेन बंडारा आणि कसुन रजीता हे पाच क्रिकेटपटू आहेत. श्रीलंकेचे क्रिकेट सीईओ अॅश्ले डी सिल्वा म्हणाले की, या पाच क्रिकेटपटूंना करारावर स्वाक्षरी करुन बायो- बबलमध्ये प्रवेश करण्यास सांगण्यात आले होते, परंतु या खेळाडूंनी करारावर सही केली नाही आणि परिणामी भारत विरुद्धच्या मालिकेसाठी त्यांना संघात सहभाग मिळणार नाही.
श्रीलंका क्रिकेट मंडळाचे प्रमुख म्हणाले आहेत की, "या पाच खेळाडूंना करारावर सही करा असे सांगण्यात आले होते. जेव्हा त्यांनी करारवर सही केली असती, तेव्हाच त्यांची भारतीय दौर्यासाठी राष्ट्रीय संघात निवड करण्याचा विचार केला असता. भारतीय संघाविरुद्ध आपल्याकडे एक दौरा करार करावा लागतो. परंतू, त्यावर त्यांनी सही केली नाही. ते पाच खेळाडू 24 खेळाडूंच्या संघातील होते. जर त्यांनी भारताविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेच्या करारावर सही केली तर त्यांना संघात घ्यायचं का नाही याचा विचार निवड समिती करेल''.
Edited By : Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.