इंग्लंडला अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात ६९ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. गतविजेत्या इंग्लंडची ही या स्पर्धेतील निराशाजनक कामगिरी आहे. या पराभवासह इंग्लंडचा संघ गुण तालिकेत पाचव्या स्थानी पोहोचला आहे.
दरम्यान या सामन्यानंतर इंग्लंड संघातील अष्टपैलू खेळाडू सॅम करनचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.
इंग्लंडचा संघ या स्पर्धेत आतापर्यंत सुमार कामगिरी करताना दिसून आला आहे. यामागचं कारण असं की, संघातील प्रमुख खेळाडूंचा सुपरफ्लॉप शो. संघातील अष्टपैलू खेळाडू सॅम करनला अजुनही सुर गवसलेला दिसत नाही.
अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यातही त्याची सुमार कामगिरी पाहायला मिळाली आहे. अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात त्याने पावरप्लेच्या षटकात २० धावा खर्च केल्या. त्यानंतर तो संताप व्यक्त करताना दिसून आला. त्याला इतका राग आला होता की, त्याने सर्व राग कॅमेरामॅनवर काढला. (Latest sports updates)
तर झाले असे की, गोलंदाजी करून आल्यानंतर सॅम करन सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत होता त्यावेळी कॅमेरामॅन त्याच्या जवळ आला. कॅमेरामॅन जवळ येताच त्याने हाताने त्याला लांब सरकवलं. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
अफगाणिस्तानचा जोरदार विजय..
या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, अफगाणिस्तानाने प्रथम फलंदाजी करताना २८४ धावांचा डोंगर उभारला होता. अफगाणिस्तानकडून रहमनुल्लाह गुरबाजने सर्वाधिक ८० धावांची खेळी केली. तर अलिखीलने ५८ धावांचे योगदान दिले.
या धावांचा पाठलाग करताना हॅरी ब्रुकने सर्वाधिक ६६ धावांची खेळी केली. इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. इंग्लंडचा संपुर्ण डाव अवघ्या २१५ धावांवर संपुष्टात आला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.