Dwayne Bravo चे नवीन गाणे रिलीज; प्रेक्षकांचा 'नंबर वन' प्रतिसाद

गाण्याचा पोस्टर आणि टीझर ज्यावेळी लाँच झाले त्यावेळी त्या चाहत्यांकडून खूप प्रेम मिळाले होते.
Dwayne Bravo
Dwayne BravoSaam TV
Published On

क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्होच्या ‘नंबर वन’ या नवीन (Dwayne Bravo’s song ‘Number One’) गाण्याच्या पोस्टर आणि टीझरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. ब्राव्हो आणि कॉलिन वेडरबर्न यांनी हे गाणे लिहिलेले आहे तर ब्लॅक शॅडो म्युझिकने ते गाणे प्रोड्यूस केले आहे. लोकप्रिय Hipi अॅप शॉर्ट व्हिडिओ या प्लॅटफॉर्म वरती हे गाणे तुम्हाला ऐकायला मिळेल.

गाण्याचा पोस्टर आणि टीझर ज्यावेळी लाँच झाले त्यावेळी त्या चाहत्यांकडून खूप प्रेम मिळाले होते. आणि गाण्यालाही तोच प्रतिसाद मिळत आहे. हे गाणे ब्रावोच्या अगोदरच्या गाण्यासारखेच खिळवून ठेवेल. या गाण्याचे चित्रीकरण ही चांगले झाले आहे. ब्राव्होने आपली सिगनेचर स्टेपही या गाण्यात केलेली आहे. लोकांना स्वतःचे चॅम्पियन होण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यांनी हार मानू नये आणि कायम पहिल्या क्रमांकावर जाण्यासाठी अधिक प्रयत्न करणे ही या गाण्यामागील संकल्पना आहे.

ड्वेन ब्रावोच्या या गाण्याविषयी बोलताना म्हणाला की हे गाणं माझ्या हृदयाच्या अगदी जवळचे आहे. डान्सिंग नंबर सारखाच माझ्या बहुतेक गाण्यांचा अर्थ डिप असतो. भारत हे माझे दुसरे घर आहे. माझे नंबर वन हे गाणं रिलीजस केल्याबद्दल मी खूप आनंदी आहे. माझे हे नवीन गाणे माझ्या चाहत्यांना आणि समर्थकांना नक्कीच आनंद देईल. चला नाचत राहू आणि मी सर्वांना नंबर वन राहण्यासाठी प्रोत्साहीत करतो.

Dwayne Bravo
IPL 2022: आजपासून क्रिकेटचा महारणसंग्राम; दोन भारतीय दिग्गज आमने-सामने

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com