
भारत विरूद्ध आयर्लंड या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना डब्लिनच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने २ धावांनी विजय मिळवला आहे. भारतीय संघ विजयाच्या स्थितीत होता. मात्र पावसामुळे या सामन्याचा निकाल लागु शकला नाही.
शेवटी डकवर्थ लुईस नियमाचा वापर करून या सामन्याचा निकाल लावण्यात आला. हा नियम क्रिकेटसाठी वरदान ठरत असला तरिदेखील अनेकदा हा नियम वादात अडकला आहे.
या नियमाला पर्याय म्हणून केरळमध्ये राहणाऱ्या सिव्हील इंजिनियर वी जयदेवन यांनी २०१२ मध्ये VJD Method नावाचं समीकरण शोधून काढलं होतं.
कोणी लावला डकवर्थ लुईस मेथडचा शोध?
डकवर्थ लुईस मेथड ही अशी गणितीय संकल्पना आहे ज्याचा वापर क्रिकेटसाठी वरदान ठरतोय. जेव्हा पावसामुळे किंवा अन्य कुठल्या कारणामुळे सामना पुर्ण होऊ शकत नाही त्यावेळी या मेथडचा सामना केला जातो.
या मेथडला डकवर्थ-लुईस-स्टर्न प्रणाली (Duckworth–Lewis–Stern Method)असं म्हणतात. हा नियम फ्रेंक डकवर्थ आणि टोनीन लुईस या ब्रिटीश संख्यातज्ञांनी शोधून काढला होता. १९९९ मध्ये पहिल्यांदाच आयसीसीने या नियमाला मान्यता दिली होती. या नियमामुळे अनेक संघांना फायदा झाला आहे. तर काही संघांना तोटा देखील सहन करावा लागला आहे.
या नियमामुळे दक्षिण आफ्रिकेला वर्ल्डकपमधून बाहेर जावं लागलं होतं. २००३ वनडे वर्ल्डकप स्पर्धेत श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात पाऊस पडण्याची दाट शक्यता होती.दक्षिण आफ्रिका संघाला सांगण्यात आलं होतं की,जर ४५ षटकात २२९ धावा केल्या तरी विजय तुमचाच होणार आहे.
दक्षिण आफ्रिकेने पुर्ण जोर लावला आणि धावसंख्या ४५ षटकअखेर २२९ धावांवर पोहचवली. पाऊस आला आणि डकवर्थ लुईस नियम लागू करण्यात आला. खरं तर दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २२९ धावा करा असं सांगण्यात आलं होतं.मात्र डकवर्थ लुईस नियमानूसार २३० धावा करायच्या होत्या. एका चूकीमुळे हा सामना ड्रॉ झाला होता आणि दक्षिण आफ्रिकेला स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं होतं. (Latest sports updates)
भारतीय इंजिनियरने शोधला पर्याय..
डकवर्थ लुईस नियमात असलेल्या चुका शोधून काढत वी जयदेवन या भारतीय इंजिनियरने VJD Method शोधून कढला. या मेथडचा वापर देशांतर्गत क्रिकेटमध्ये डकवर्थ लुईसचा पर्याय म्हणून वापर केला जातो. अनेक तज्ञांचं असं म्हणणं आहे की, VJD Method हा डकवर्थ लुईसपेक्षा कितीतरी पटीने चांगला आणि समजण्यासाठी सोपा आहे. मात्र तरीदेखील आयसीसीने या नियमाला अजून मान्यता दिलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.