National Sports Awards 2022 : क्रिकेट क्षेत्रात प्रशिक्षक म्हणुन उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दिनेश लाड (dinesh lad) यांना नुकताच राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांच्या हस्ते द्रोणाचार्य आजीवन पुरस्कार प्रदान करण्यात आला. गेल्या तीस वर्षांपासून लाड हे क्रिकेट (cricket) प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
मुंबईतील (mumbai) बोरीवलीतील स्वामी विवेकानंद हायस्कूल याठिकाणी लाड यांची क्रिकेट अकादमी आहे. त्यांच्या या अकादमीतून अनेक प्रसिद्ध क्रिकेट खेळाडू आतापर्यंत तयार झालेले आहेत. आगामी काळात उत्तम खेळाडू घडविण्याचा त्यांचा मानस असल्याचे त्यांनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केला.
हा पुरस्कार स्विकारताना आणि त्याबाबतची भावना व्यक्त करताना लाड भावविवश झाले. ते म्हणाले हा पुरस्कार घेताना मीच स्तब्ध झालो होतो. पुरस्कार मिळाला ही माझ्या आयुष्यातील खूप मोठी गोष्ट आहे.
गेली 28 वर्ष मी क्रिकेट कोचिंग करतोय. शार्दूल (shardul thakur) आणि रोहित (rohit sharma) यांनी जे कर्तुत्व दाखवलं त्यामुळे मला पुरस्कार मिळाला. क्रिकेटर कोणी घडवत नाही ते घडले जातात. शासनाने मला खेळाडूंसाठी (players) मैदान द्यावं अशी अपेक्षा लाड यांनी व्यक्त केली आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.