MS Dhoni - Chahar Video: कॅप्टन कुलचे कधी न पाहिलेले रूप! भर मैदानात दीपक चाहरला लगावली थप्पड? - VIDEO

MS Dhoni Slapped Deepak Chahar: चेन्नईच्या विजयापेक्षा एमएस धोनी आणि दीपक चाहर या सामन्यात जास्त चर्चेत राहिले.
ms dhoni
ms dhoni twitter

MS Dhoni Funny Video: आयपीएल २०२३ स्पर्धेतील ५५ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने जोरदार कामगिरी करत २७ धावांनी विजय मिळवला.

चेन्नईच्या विजयापेक्षा एमएस धोनी आणि दीपक चाहर या सामन्यात जास्त चर्चेत राहिले. दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. ज्यात एमएस धोनी दीपक चाहरला कानाखाली मारताना दिसून येत आहे.

ms dhoni
Suresh Raina On MS Dhoni: धोनी 'या' दिवशी खेळणार आपला शेवटचा सामना; सुरेश रैनाने केला खुलासा

कॅप्टन कुल म्हणून ओळखला जाणारा एमएस धोनी हा आपल्या मजेशीर स्वभावामुळे देखील ओळखला जातो. अनेकदा तो मैदानावर असताना मस्ती करताना दिसून आला आहे. नुकताच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

ज्यात तो आपल्या संघातील सहखेळाडू दीपक चाहरला कानाखाली मारण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ सध्या नेटिझन्सचे लक्ष वेधून घेताना दिसून येत आहे.

या व्हिडिओबद्दल बोलायचं झालं तर, हा व्हिडिओ नाणेफेकीच्या नंतरचा आहे. तर झाले असे की, चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यापूर्वी एमएस धोनी नाणेफेक करून येत होता.

त्यावेळी दीपक चाहर आपल्याच संघातील एका खेळाडूसोबत गप्पा मारत उभा होता. त्यावेळी त्याच्या मागून जात असताना एमएस धोनी त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करतो. त्याचवेळी तो दीपक चाहरला कानाखाली मारण्याचा प्रयत्न करताना देखील दिसून येत आहे. क्रिकेट चाहते या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. (Latest sports updates)

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, चेन्नई सुपर किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाने २० षटक अखेर ८ गडी बाद १६७ धावा केल्या होत्या. चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून शिवम दुबेने १२ चेंडूंचा सामना करत २५ धावांची खेळी केली.

तर सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडने २४ धावांची खेळी केली. शेवटी एमएस धोनीने खणखणीत षटकार मारत २० धावांची खेळी केली.

या धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स संघाकडून रायले रुसोने सर्वाधिक ३५ धावांची खेळी केली. तर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या मनीष पांडेने २७ धावा केल्या. शेवटी अक्षर पटेलने २१ धावा चोपल्या. मात्र दिल्लीचा संघ विजयापासून २७ धावा दूर राहीला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com