CWG 2022 : क्रिकेटमध्ये महिला संघाची मोठी कामगिरी! जिंकले रौप्यपदक

राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदाच रौप्यपदक जिंकले.
CWG 2022
CWG 2022 Saam Tv

India Women vs Australia Women Final: राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदाच रौप्यपदक जिंकले. पहिल्याच वर्षात भारतीय क्रिकेट (Cricket) महिला संघाने पदक जिंकून इतिहास रचला. यापूर्वी १९९८ मध्ये पुरुष क्रिकेट संघालाही या खेळामध्ये स्थान मिळाले होते, पण भारतीय संघाला पदक जिंकता आले नव्हते.

एकदिवसीय विश्वचषक आणि टी-20 विश्वचषकापाठोपाठ कॉमनवेल्थ गेम्समध्येही ऑस्ट्रेलियाने सुवर्णपदक जिंकले. फायनलमध्ये T20 वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने सामन्यात भारतीय संघाचा ९ धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाने १६१ धावा केल्या. यानंतर भारतीय संघ १५२ धावांवर गारद झाला. हरमनप्रीतने शानदार अर्धशतक झळकावले.

CWG 2022
Commonwealth Games 2022 : भारताला बॉक्सिंगमध्ये आणखी एक सुवर्णपदक; बॉक्सर निखत जरीनची सुवर्ण झळाली

रेणुका सिंगने सामन्याच्या तिसऱ्या षटकात एलिसा हिलीची विकेट घेतली. ६ षटकांच्या पॉवरप्लेनंतर धावसंख्या ४३ होती, पण पुढील ४ षटकात ऑस्ट्रेलियाच्या संघाने ४० धावा केल्या याच धावा निर्णायक ठरल्या.

(Cricket) हरमनप्रीत कौरने १० व्या षटकादरम्यान ४ षटकांसाठी ४ गोलंदाजांना गोलंदाजी दिली. राधा यादव ७ व्या षटकात ३, स्नेह राणा ८ व्या षटकात ८, पूजा वस्त्राकर ९ व्या षटकात १२ आणि १० व्या षटकात हरमनप्रीत १७ धावा केल्या.

१२व्या षटकात दीप्ती शर्माने ताहिला मॅकग्राची मोठी विकेट घेतली. ती तिच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखली जाते. यानंतरही त्याची ४ षटके तीन स्पेलमध्ये पूर्ण झाली. कांगारू संघाने शेवटच्या ५ षटकात ३६ धावा केल्या.

CWG 2022
Commonwealth Games 2022 : नितू घनघासची सुवर्णपदकाला गवसणी

भारताने २२ धावांत दोन्ही सलामीवीरांच्या विकेट गमावल्या. त्यामुळे संघ अडचणीत आला. या सामन्यात २ अर्धशतके झळकावणाऱ्या स्मृती मंधानाने ६ आणि आक्रमक फलंदाज शेफाली वर्माने ११ धावा केल्या.

हरमनप्रीत कौर आणि जेमीम रॉड्रिग्ज यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९६ धावांची मोठी भागीदारी करत संघाला सामन्यात पुनरागमन केले. पण संघाने शेवटच्या ८ विकेट ३४ धावांत गमावल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com