FIFA WC 2022: पराभवाचं सेलिब्रेशन महागात पडलं; सैन्याने थेट डोक्यात गोळी झाडली

लष्कराने एका व्यक्तीच्या डोक्यात गोळी झाडल्याचा दावा केला जात आहे.
Iran
Iran Saam Tv
Published On

 FIFA World Cup 2022 : फुटबॉल वर्ल्ड कपमुळे चाहते आनंदात आहेत. आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी अनेक जण थेट कतारमध्ये पोहोचले आहेत. मात्र आपल्या देशाच्या पराभवाच्या सेलिब्रेशनमुळे इराणमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळत आहे. मंगळवारी अमेरिकेविरुद्धच्या पराभवानंतर लोक रस्त्यावर उतरले आणि आपल्या देशाच्या पराभवाचा आनंद साजरा करू लागले.

यादरम्यान येथील लष्कराने एका व्यक्तीच्या डोक्यात गोळी झाडल्याचा दावा केला जात आहे. 38व्या मिनिटाला ख्रिस्टन पुलिसिकच्या गोलच्या जोरावर अमेरिकेने इराणवर 1-0 असा विजय मिळवत फिफा विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला. तर इराण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. (Latest Marathi News)

Iran
FIFA World Cup : मेस्सीने रचला इतिहास; अर्जेंटिनाचा पोलंडवर दमदार विजय, प्री-क्वार्टर फायनलमध्ये केला प्रवेश

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मंगळवारी रात्री इराण विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर सरकारविरोधी निदर्शकांनी सार्वजनिकरित्या आनंद साजरा केला. कार्यकर्त्यांनी सांगितले की, पूर्व इराणमध्ये सैन्याने कारचा हॉर्न वाजवल्यानंतर 27 वर्षीय मेहरान सामकच्या डोक्यात गोळी झाडली.

इराण इंटरनॅशनलच्या रिपोर्टनुसार, संबंधित व्यक्ती आपल्या प्रेयसीसोबत कारमध्ये बसला होता. त्याचवेळी इराणच्या सुरक्षा दलाच्या सदस्याने त्याच्या डोक्यात गोळी झाडली. त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले जेथे नंतर त्याचा मृत्यू झाला. अनेक इराणींनी कतार विश्वचषकात त्यांच्या संघाला देशाच्या जुलमी राजवटीचे प्रतीक म्हणून पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. या सेलिब्रेशनचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Iran
Team India ODI World Cup: ...तर वनडे वर्ल्डकप आपलाच!, हे 'धाकड' खेळाडू ठरतील गेमचेंजर

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मंगळवारी रात्री इराण विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर सरकारविरोधी निदर्शकांनी रस्तावर उतरत आनंद साजरा केला. पूर्व इराणमधील बंदर अंजलीत सैन्याने कारचा हॉर्न वाजवल्यामुळे 27 वर्षीय मेहरान सामकच्या डोक्यात गोळी झाडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com