RCB News: आरसीबीला दुहेरी धक्का! संघातील 'इम्पॅक्ट प्लेअर' अन् प्रमुख वेगवान गोलंदाज संपूर्ण स्पर्धेतून बाहेर!

Rajat Patidar And Josh Hazlewood News: दुसऱ्या सामन्यापूर्वीच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला दुहेरी धक्का बसला आहे.
IPL 2023, RCB vs MI Match Updates
IPL 2023, RCB vs MI Match UpdatesSaam TV

Rajat Patidar Ruled Out Of IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेला जोरदार सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्ताखाली खेळणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने देखील या हंगामाची जोरदार सुरुवात केली आहे.

हंगामातील पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने मुंबई इंडियन्स संघावर ८ गडी राखून विजय मिळवला होता.

आता दुसऱ्या सामन्यापूर्वीच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला दुहेरी धक्का बसला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ जोरदार कामगिरी करत असताना, संघातील प्रमुख फलंदाज रजत पाटीदार (Rajat Patidar) संपूर्ण हंगमातून बाहेर झाला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सोशल मीडियावर ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, 'दुर्दैवाने टाचांच्या दुखण्यामुळे आयपीएल २०२३ स्पर्धेतून बाहेर पडला आहे.रजत लवकर बरा व्हावा अशी आमची इच्छा आहे आणि प्रक्रियेदरम्यान त्याला पाठिंबा देत राहू..' (Latest sports updates)

रजत पाटीदारच्या जागी कोणाला संधी मिळणार याबाबत कुठलीही घोषणा करण्यात आली नाहीये. रजत पाटीदारला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएल २०२३ स्पर्धेसाठी रिटेन केले होते. आयपीएल २०२२ स्पर्धेत तो अन्सोल्ड राहिला होता.

त्यानंतर त्याला रिप्लेसमेंट म्हणून संधी दिली गेली होती. त्याने आयपीएल २०२२ स्पर्धेतील एलिमिनेटरच्या सामन्यात लखनऊ सुपारी जायंट्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात अवघ्या ५४ चेंडूंमध्ये ११२ धावांची खेळी केली होती.

IPL 2023, RCB vs MI Match Updates
IPL 2023 DC vs GT : हार्दिक पंड्यासमोर प्लेइंग- ११ चे आव्हान; ३२९ षटकार मारणारा स्फोटक फलंदाज घेणार विलियमसनची जागा

केवळ रजत पाटीदार नव्हे तर जोश हेजलवूड देखील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची चिंता वाढवू शकतो. कारण दुखापतग्रस्त असलेला जोश हेजलवूड अजूनही भारतात परतलेला नाहीये. तो बॉर्डर -गावसकर ट्रॉफी सुरु असताना मायदेशी परतला होता.

अशी शक्यता वर्तवली जात आहे की, जोश हेजलवूड सुरवातीचे ७ सामने संघाबाहेर राहू शकतो. त्यामुळे येणाऱ्या सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला जोश हेजलवूड आणि रजत पाटीदारची कमतरता जाणवू शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com