Meg Lanning Retirement: मोठी बातमी! ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराची तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

Meg Lanning Retired From International Cricket: ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज कर्णधाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम करण्याचा निर्णय घेतला आहे.
meg lanning
meg lanning saam tv news
Published On

Meg Lanning Retired From International Cricket:

वर्ल्डकप सुरु असताना क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाची कर्णधार मेग लेनिंगला सर्वांना आश्चर्यचकीत करणारा निर्णय घेतला आहे. तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. मेग लेनिंगच्या नेतृ्त्वात ऑस्ट्रेलियाने १ वेळेस आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपद पटकावलं आहे. यासह तिने ४ वेळेस ऑस्ट्रेलियाला महिला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचा खिताब जिंकून दिला आहे. तिच्या कारकिर्दिबद्दल बोलायचं झालं तर तिने ८ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. (Meg Lanning Retirement)

क्रिकेट ऑस्ट्रलियाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये निवृत्ती जाहीर केल्यानंतर ती व्यक्त होताना दिसून येत आहे. तिने म्हटलं की, 'आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणं हा माझ्यासाठी खूप कठीण निर्णय होता. पण मला वाटलं की,हीच योग्य वेळ आहे. मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते की, मला १३ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली.'

तसेच ती पुढे म्हणाली की,'मात्र आता मला असं वाटत आहे की, काहीतरी नवीन करण्याची वेळ आहे. मी माझ्या कारकिर्दीत जे काही मिळवलं त्याचा मला अभिमान आहे. माझ्या संघसहकाऱ्यांसोबत घालवलेले प्रत्येक क्षण मला लक्षात राहतील. मी माझे कुटुंब, संघातील खेळाडू, क्रिकेट व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलियन क्रिकेट असोसिएशन आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे आभार मानते.' (Latest sports updates)

meg lanning
World Cup 2023: न्यूझीलंड,पाकिस्तान की अफगाणिस्तान? टीम इंडियासोबत सेमीफायनलमध्ये कोण भिडणार? वाचा समीकरण

मेग लेनिंगची कामगिरी..

मेग लेनिंग ही ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाची सर्वात यशस्वी कर्णधार आहे. तिने २०१४ मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाला टी-२० वर्ल्डकप जिंकून दिला होता. तिने कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलियाला आतापर्यंत एकुण ५ वेळेस वर्ल्डकप स्पर्धेचं जेतेपद जिंकून दिलं आहे. ज्यात ४ वेळेस टी-२० वर्ल्डकप आणि १ वेळेस वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदाचा समावेश आहे.

meg lanning
IND vs PAK, World Cup 2023 : भारत-पाकिस्तान सेमीफायनलमध्ये भिडणार? कसं आहे पॉईंट टेबलचं समीकरण?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com