WPL 2023: गुजरात जायंट्सला मोठा धक्का! कर्णधार बाहेर,तर 'या' भारतीय खेळाडूकडे सोपवली नेतृत्वाची जबाबदारी

Gujarat Giants: स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात गुजरात जायंट्स संघाला मोठा धक्का बसला होता
Beth Mooney
Beth MooneyTwitter

WPL 2023 Beth Mooney: विमेन्स प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेत गुजरात जायटन्स संघाने बुधवारी झालेल्या सामन्यात जोरदार विजय मिळवला आहे.

गुजरात जायंट्स संघाने आतापर्यंत ३ सामने खेळले आहेत. हा या स्पर्धेतील गुजरातचा पहिलाच विजय आहे. दरम्यान या सामन्यानंतर गुजरात जायंट्स संघाला मोठा धक्का बसला आहे. (Latest sports updates)

Beth Mooney
IND VS AUS 4th Test: चौथा कसोटी सामना पाहण्यासाठी दोन्ही देशातील पंतप्रधानांची उपस्थिती; नरेंद्र मोदी कॉमेंट्री करण्याची शक्यता

स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात गुजरात जायंट्स संघाला मोठा धक्का बसला होता. कर्णधार बेथ मुनी दुखापतग्रस्त झाल्याचे पाहायला मिळाले होते. या दुखापतीमुळे आता ती संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडली आहे.

तिच्याऐवजी लॉरा वोल्वार्डला संघात स्थान दिले गेले आहे. बेथ मुनीच्या अनुपस्थितीत स्नेह राणा संघाचे नेतृत्व करताना दिसून आली होती. त्यामुळे स्नेह राणा संपूर्ण हंगामात संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे.

Beth Mooney
IND VS AUS 4th test: चौथा कसोटी सामना जिंकून टीम इंडिया इतिहास रचणार! जगातील कुठल्याच संघाला न जमलेला पराक्रम करण्याची संधी

गुजरात संघाला या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्स संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. मुंबई इंडियन्सने हा सामना १४३ धावांनी आपल्या नावावर केला होता.

तर दुसऱ्या सामन्यात युपी वॉरियर्स संघाने गुजरात संघावर ३ गडी राखून विजय मिळवला होता. तर तिसऱ्या सामन्यात गुजरात जायंट्स संघाने ११ धावांनी विजय मिळवला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com