Usman Khawaja Wicket: फेविकॉलसारखा चिपकलेला उस्मान ख्वाजा असा अडकला इंग्लंडच्या जाळ्यात! खास प्लान करत मिळवली विकेट- VIDEO

ENG vs AUS : उस्मान ख्वाजाला बाद करण्यासाठी इंग्लडने खास प्लान केला होता. ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
usman khawaja wicket
usman khawaja wickettwitter
Published On

ENG VS AUS 1st Test: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही अॅशेस मालिकेला प्रारंभ झाला आहे. या मालिकेतील पहिला सामना बर्मिंगहॅमच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३८६ धावांवर संपुष्ठात आला आहे. यापूर्वी इंग्लड संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना ३९३ धावा केल्या होत्या.

ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने सर्वाधिक १४१ धावांची खेळी केली. त्याला ऑली रॉबिन्सनने बाद करत माघारी धाडले. उस्मान ख्वाजाला बाद करण्यासाठी इंग्लडने खास प्लान केला होता. ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

usman khawaja wicket
TNPL 2023: अश्विनने हवेत उडी मारत टिपला भन्नाट कॅच! VIDEO पाहून विश्वासच बसणार नाही..

तर झाले असे की, पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांची जोडी मैदानात आली होती. या डावात डेव्हिड वॉर्नर अवघ्या ९ धावा करत माघारी परतला. मात्र उस्मान ख्वाजाने टिचून फलंदाजी केली.

त्याने ३२१ चेंडूंचा सामना करत १४१ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने १४ चौकार आणि ३ षटकार मारले. या डावात उस्मान ख्वाजा काही आउट व्हायचं नाव घेत नव्हता, त्याला बाद करण्यासाठी इंग्लंडने खास फिल्ड सेटअप केला होता.

उस्मान ख्वाजा बाद झाल्यानंतर एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की,त्याला बाद करण्यासाठी इंग्लंडने आगळा वेगळा फिल्ड सेटअप केला आहे.

त्यांनी उस्मान ख्वाजासमोर ६ फिल्डर्स तैनात केल्याचं दिसून येत आहे. इंग्लंडने जोरदार फॉर्ममध्ये असलेल्या उस्मान ख्वाजावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचा हा प्रयत्न यशस्वी ठरला. (Latest sports updates)

अॅशेस मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ८ गडी बाद ३९३ धावा करत डाव घोषित केला होता. या धावांचा प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३८६ धावा केल्या आहेत. दुसऱ्या डावात आघाडी घेऊन उतरलेल्या इंग्लड संघाला ऑस्ट्रेलियाने सुरुवातीलाच २ धक्के दिले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com