Glenn McGrath Viral Video: बापरे! ग्लेन मॅकग्राच्या घरात घुसले ३ भलेमोठे साप; धाडस करत स्वत:च काढले बाहेर, व्हिडिओ व्हायरल

Glenn McGrath Snake Rescue Video: भल्या भल्या फलंदाजांची दांडी गुल्ल करणारा हा गोलंदाज अजगर पकडताना दिसून येत आहे.
Glenn McGrath Snake Rescue Video
Glenn McGrath Snake Rescue Videotwitter
Published On

Glenn McGrath Snake Rescue Video:

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज ग्लेन मॅकग्राचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. भल्या भल्या फलंदाजांची दांडी गुल्ल करणारा हा गोलंदाज अजगर पकडताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ त्याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे.

Glenn McGrath Snake Rescue Video
Asia Cup 2023: आशिया चषकाच्या अंतिम सामन्यावर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास कोण होईल विजेता?

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ग्लेन मॅकग्राच्या घरात अजगर घुसला आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी ग्लेन मॅकग्रा शर्थीचे प्रयत्न करताना दिसून येत आहे. मात्र जिगरबाज ग्लेन मॅकग्रा न घाबरता न डगमगता स्वत:चा बचाव करत त्याला अजगराला बाहेर काढताना दिसून येत आहे. यादरम्यान अनेकदा अजगरने त्याच्यावर हल्ला देखील केला.

एक नव्हे तर ३ साप...

शेवटी ग्लेन मॅकग्राने बाजी मारली आणि त्या सापाला पकडून बाहेर नेलं. मुख्य बाब म्हणजे या ४ फुटी सापाला त्याने मॉपच्या साहाय्याने बाहेर काढलं. हा व्हिडिओ त्याने आपल्या अधिकृत सोशल मीडियावर शेअर करत लिहिले की, सारा लियोन मॅकग्राच्या समर्थनामुळे आणि तिने माझा उत्साह वाढवल्यामुळे मी ३ कोस्टल कार्पेट सापांना सुरक्षितरित्या बाहेर काढू शकलो आहे. (Latest sports updates)

ऑस्ट्रेलियाला ३ वेळा बनवलं आहे चॅम्पियन..

ग्लने मॅकग्रा हा ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख खेळाडूंपैकी एक होता. त्याने ऑस्ट्रेलियाला १९९९,२००३ आणि २००७ वनडे वर्ल्डकप जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. तसेच त्याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने २५० वनडे सामन्यांमध्ये ३८१ गडी बाद केले आहेत.

तर १२४ कसोटी सामन्यांमध्ये ५६३ गडी बाद केले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना या गोलंदाजाने ३ वेळा १० गडी बाद करण्याचा विक्रम केला आहे. तर २९ वेळेस ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com