ॲशेस इज बॅक! AUS vs ENG मालिकेचा बिगुल वाजला; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Ashes 2025-26 Schedule: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या अॅशेस मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.
ॲशेस इज बॅक! AUS vs ENG मालिकेचा बिगुल वाजला; पाहा संपूर्ण वेळापत्रक
eng vs austwitter
Published On

AUS vs ENG, Ashes 2025-26 Schedule: कसोटी क्रिकेटमध्ये अॅशेस मालिकेची वेगळीच क्रेझ आहे. ही मालिका इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये खेळली जाते. मात्र जवळजवळ सर्वच देशातील क्रिकेट फॅन्स या मालिकेची आतुरतेने वाट पाहत असतात.

ही मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघातील खेळाडू पूर्ण जोर लावतात. नुकताच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या अॅशेस २०२५-२६ मालिकेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेचा थरार रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना २१ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे. हा सामना पर्थच्या मैदानावर खेळवला जाईल.

त्यानंतर ४ ते ८ डिसेंबरदरम्यान मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. हा सामना ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमव रंगणार आहे. मालिकेतील तिसरा सामना १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर रोजी खेळवला जाईल. मालिकेतील चौथा कसोटी सामना हा बॉक्सिंग डे सामना असणार आहे. तर मालिकेतील शेवटचा सामना हा ४ ते ८ जानेवारी दरम्यान रंगणार आहे.

ॲशेस इज बॅक! AUS vs ENG मालिकेचा बिगुल वाजला; पाहा संपूर्ण वेळापत्रक
IND vs NZ, 1st Test: न्यूझीलंडला मोठा धक्का! संघातील प्रमुख खेळाडू पहिल्या कसोटीला मुकणार

कसा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड?

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या अॅशेस मालिकेतील इतिहास पाहिला, तर दोन्ही संघ ७३ मालिकांमध्ये आमनेसामने आले आहेत. यादरम्यान ऑस्ट्रेलियाने ३४ वेळेस बाजी मारली आहे. तर इंग्लंडने ३२ मालिकांमध्ये बाजी मारली आहे.

यादरम्यान ७ मालिका ड्रॉ झाल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंतचा रेकॉर्ड पाहिला, तर ऑस्ट्रेलियाचा संघ आघाडीवर आहे. त्यामुळे इंग्लंडचा संघ ही मालिका जिंकून ऑस्ट्रेलियाच्या जवळ पोहोचण्याच्या प्रयत्नात असणार आहे. मात्र हे मुळीच सोपं नसणार आहे. कारण, ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये हरवणं हे इंग्लंडसमोरील मोठं आव्हान असणार आहे.

ॲशेस इज बॅक! AUS vs ENG मालिकेचा बिगुल वाजला; पाहा संपूर्ण वेळापत्रक
IND vs NZ: बंगळुरुत पावसाची बॅटिंग! सामना केव्हा सुरु होणार? वाचा लेटेस्ट अपडेट

ऑस्ट्रेलिया- इंग्लंड अॅशेस मालिकेचं वेळापत्रक

  1. २१ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर - पर्थ

  2. ४ डिसेंबर ते ८ डिसेंबर - गाबा

  3. १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर- अॅडिलेड

  4. २६ डिसेंबर ते ३० डिसेंबर- मेलबर्न

  5. ४ जानेवारी ते ८ जानेवारी- सिडनी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com