AUS vs PAK: बॉक्सिंग डे कसोटीत पाकिस्तानचा पराभव! कमिन्सच्या १० विकेट्सच्या बळावर ऑस्ट्रेलियाने सामन्यासह मालिकाही जिंकली

Australia vs Pakistan 2nd Test: पाकिस्तानचा संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना MCG मध्ये पार पडला
australian cricket team
australian cricket teamgoogle
Published On

AUS vs PAK 2nd Test, Boxing Day Test:

पाकिस्तानचा संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना MCG मध्ये पार पडला. या सामन्यात पाकिस्तानला विजयासाठी ३१७ धावांची गरज होती.

या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव २३७ धावांवर संपुष्टात आला आहे. यासह ऑस्ट्रेलियाने या सामन्यात ७९ धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह पाकिस्तानने या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे.

या दोन्ही संघांमध्ये अप्रतिम लढत पाहायला मिळाली. पाकिस्तानी फलंदाजांनी संघाला विजय मिळवून देण्यासाठी हात पाय मारले. मात्र ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी त्यांना सामन्यात पुढे जाण्याची संधी दिली नाही.

या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ३१८ धावा केल्या होत्या. या धावांच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचा डाव अवघ्या २६४ धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्सने सर्वाधिक ५ गडी बाद केले. (Latest sports updates)

australian cricket team
IND vs SA, Test Series: दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का ! दुसऱ्या सामन्यातून मॅचविनर खेळाडू बाहेर

दुसऱ्या डावात आघाडी घेऊन फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात २६२ धावा केल्या. या डावात मिचेल मार्शने सर्वाधिक ९६ धावांची खेळी केली. तर अॅलेक्स कॅरीने ५३ धावा चोपल्या. या खेळीसह ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानसमोर विजयासाठी ३१७ धावांचं आव्हान ठेवलं होतं.

australian cricket team
IND vs SA: टीम इंडिया कुठे कमी पडली, खेळाडूंच्या बेजबाबदारपणावरुन सुनील गावस्कर भडकले, म्हणाले...

या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानी फलंदाजांनी कडवी झुंज दिली. पाकिस्तानकडून शान मसूदने ६० धावा केल्या. तर सलमान अली आगाने मोहम्मद रिझवानसोबत मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली. मात्र रिझवान बाद झाल्यानंतर पाकिस्तानचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. पाकिस्तानचा संपूर्ण डाव अवघ्या २३७ धावांवर संपुष्टात आला.

या विजयात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने मोलाचं योगदान दिलं आहे. पॅट कमिन्सने या सामन्यातील दोन्ही डावात मिळून १० गडी बाद केले आहेत. यासह MCG च्या मैदानावर गोलंदाजी करताना १० गडी बाद करणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com