मिस्टर इंडियाचा किताब पटकावणाऱ्या मनोज पाटीलकडून आत्महत्येचा प्रयत्न

साहिल खानच्या त्रासाला कंटाळून मनोज पाटीलने हे पाऊल उचलल्याचा आरोप
मिस्टर इंडियाचा किताब पटकावणाऱ्या मनोज पाटीलकडून आत्महत्येचा प्रयत्न
मिस्टर इंडियाचा किताब पटकावणाऱ्या मनोज पाटीलकडून आत्महत्येचा प्रयत्नSaam Tv
Published On

मुंबई - मिस्टर इंडिया किताब पटकावणाऱ्या मनोज पाटीलने Manoj Patil आत्महत्या Suicide करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. २९ वर्षीय मनोजने विषारी गोळ्या खाऊन आपले आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. काल रात्री उशिरा कुटुंबियांनी त्याला मुंबईतील Mumbai कूपर रुग्णालयात Cooper hospital दाखल केले. सध्या मनोजची तब्येत स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. बॉलिवूड अभिनेता साहिल खानच्या त्रासाला कंटाळून मनोज पाटीलने हे पाऊल उचलल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.

हे देखील पहा -

साहिल खानविरोधात याआधीही मनोजने पोलिसात तक्रार केली होती. अभिनेता साहिल खान माझ्यावर जळतो. मानसिक त्रास देतो. माझं करिअर संपवण्याची धमकी देतो तसेच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देतो असा आरोप मनोजने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत आहे.

मिस्टर इंडियाचा किताब पटकावणाऱ्या मनोज पाटीलकडून आत्महत्येचा प्रयत्न
परळीची लेक म्हणून माझ्यासाठी ही दुःखाची गोष्ट आहे- प्रीतम मुंडेंचा सरकारवर निशाणा

मनोज पाटीलने २०१६ मध्ये ‘मिस्टर इंडिया मेन्स फिजिक ओव्हरऑल चॅम्पियनशिप’ हा किताब पटकावला होता. तो एक सुप्रसिद्ध मॉडेल, अॅथलीट आणि ट्रेनर आहे. तर साहिल खान हा एक बॉलिवूड चित्रपट अभिनेता, यूट्यूबर आणि फिटनेस उद्योजक आहे. फिटनेस जागरूकता वाढवण्यासाठी तो ओळखला जातो.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com