Arshdeep Singh: अर्शदीपवर कारवाई झालीच पाहिजे! फ्रेंचायजीने तक्रार करताच मुंबई पोलिसांनी दिला भन्नाट रिप्लाय

Mumbai Police Viral Tweet: शनिवारी वानखेडेच्या मैदानावर मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये हाय वोल्टेज सामना पार पडला.
arshdeep singh
arshdeep singh saam tv
Published On

MI VS PBKS IPL 2023: शनिवारी वानखेडेच्या मैदानावर मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये हाय वोल्टेज सामना पार पडला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने मुंबई इंडियन्स संघावर १३ धावांनी विजय मिळवला. पंजाबचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग या विजयाचा शिल्पकार ठरला. दरम्यान या विजयानंतर मुंबई पोलिस आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सोशल मीडियावर झालेला रंजक संवाद सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

पंजाबचा आक्रमक गोलंदाज अर्शदीप सिंगने काल मुंबईच्या फलंदाजांवर चांगलाच हल्लाबोल केला. ४ विकेट्स घेणाऱ्या अर्शदीप सिंगने शेवटच्या षटकात २ विकेट्स घेतल्या. यादरम्यान त्याने २ स्टंप देखील तोडले. या कामगिरीनंतर भन्नाट मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान पंजाब किंग्ज संघाने एक ट्विट केल्यानंतर मुंबई पोलिसांनी भन्नाट रिप्लाय दिल्याचे पाहायला मिळाले आहे.

arshdeep singh
Arshdeep Singh Wickets Video: नाद करा पण अर्शदीपचा कुठं! सलग २ चेडूंवर स्टंपचे केले २ तुकडे पाहा VIDEO

अर्शदीप सिंगने स्टंप तोडताच, पंजाब किंग्ज संघाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून हा स्टंप तोडल्याचा फोटो शेअर करण्यात आला आहे. ज्यावर कॅप्शन म्हणून त्यांनी 'आम्हाला गुन्हा नोंदवायचा आहे..' असे लिहिले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी मुंबई पोलिसांना टॅग केले आहे. (Mumbai Police Tweet)

पंजाब किंग्ज संघाने ट्विट करताच मुंबई पोलिसांनी देखील या ट्विटला भन्नाट रिप्लाय दिला आहे. मुंबई पोलिसांनी या ट्विटला रिट्विट करत म्हटले की, 'कायदा मोडणाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता असते. स्टंप तोडणाऱ्यांवर नाही...' या ट्विटवर नेटकऱ्यांनी देखील भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Latest sports updates)

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्ज संघाने ८ गडी बाद २१४ धावा केल्या होत्या.

पंजाबकडून कर्णधार सॅम करनने सर्वाधिक ५५ धावांची खेळी केली. तर हरप्रित सिंग भाटियाने ४१ धावांचे योगदान दिले. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाकडून कॅमेरून ग्रीनने सर्वाधिक ६७ धावांची खेळी केली. तर सूर्यकुमार यादवने ५७ धावांचे योगदान दिले. मात्र शेवटच्या षटकात मुंबईला १३ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com