Arshad Nadeem Statement: 'भारत आणि पाकिस्तान जगात एक...',पराभूत झालेल्या अरशद नदीमचं मन जिंकणारं वक्तव्य

Arshad Nadeem Congratulates Neeraj Chopra : या स्पर्धेनंतर अरशद नदीमने नीरज चोप्राबद्दल मन जिंकणारं वक्तव्य केलं आहे.
arshad nadeem with neeraj chopra
arshad nadeem with neeraj chopratwitter
Published On

Arshad Nadeem On Neeraj Chopra:

वर्ल्ड अॅथलेटीक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत गोल्डन बॉय नीरज चोप्रा पुन्हा एकदा चमकला आहे. त्याने या स्पर्धेतील भालाफेक इव्हेंटच्या अंतिम फेरीत भारताला सुवर्णपदक जिंकून दिलं आहे.

अंतिम फेरीत त्याने ८८.१७ मीटर लांब भाला फेकून पुन्हा एकदा भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे.

भारताचा स्टार पहिल्या स्थानी राहिला तर पाकिस्तानचा भालाफेकपटू अरशद नदीमला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे.

दरम्यान हे पदक जिंकल्यानंतर त्याने नीरज चोप्राबद्दल मन जिंकणारं वक्तव्य केलं आहे.

arshad nadeem with neeraj chopra
World Athletics Championships: भारतीय पोरांचं जग जिंकण्याचं स्वप्न हुकलं! 4x400 इव्हेंटच्या फायनलमध्ये भारताच्या पदरी निराशा

वर्ल्ड अॅथलेटीक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत दुसऱ्या स्थानी असलेल्या अरशद नदीमने अला विश्वास व्यक्त केला आहे की, पॅरीस ऑलिम्पिकमध्येही आम्ही पहिल्या दुसऱ्या स्थानी असू.

अरशद नदीमने म्हटले की, 'मला नीरजसाठी खुप आनंद होतोय. भारत आणि पाकिस्तान जगात एक आणि दोन आहे. इंशाअल्लाह आम्ही ऑलिम्पिकमध्येही एक आणि दोन असु.'

अरशद नदीम यापूर्वी देखील दुसऱ्या स्थानी तर नीरज चोप्रा पहिल्या स्थानी राहिला होता. त्यावेळी देखील अरशद नदीमने नीरज चोप्राचा उत्साह वाढवला होता. अंतिम फेरीत भारताच्या ३ भालाफेकपटूंचा समावेश होता.

ज्यात किशोर जेना (८४.७७ मीटर), डीपी मनु (८४.१४ मीटर) यांचा समावेश होता. या दोघांनी क्रमशा पाचवे आणि सहावे स्थान पटकावले. (Latest sports updates)

नीरज चोप्राने अंतिम फेरीत सुरूवातील फाऊल केला. त्यानंतर त्याने ८८.१७ मीटर, ८६.३२ मीटर, ९७.७३ मीटर आणि ८३.९८ मीटर थ्रो केला. तर पाकिस्तानच्या अरशद नदीमने या हंगामातील सर्वोत्तम कामगिरी करत ८७.८२ मीटर थ्रो केला.

यासह त्याने रौप्यपदकाला गवसणी घातली आहे. तर चेक गणराज्यच्या याकुबने तिसरे स्थान गाठत कांस्यपदकाला गवसणी घातली आहे. नीरज चोप्राच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

तो ऑलिम्पिक आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत पदक जिंकणारा दुसराच भारतीय खेळाडू ठरला आहे. भारताकडून अभिनव बिंद्राने २३ व्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत पदक जिंकले होते. त्यानंतर २५ व्या वर्षी त्याने ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com