Akash Madhwal Bowling : इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आला अन् गिलची दांडी उडवून गेला,स्टंप उडून पडला ५ फूट लांब - VIDEO

Shubman Gill Wicket : आकाश मधवालने शुभमन गिलला एक भन्नाट चेंडू टाकला आहे
Akash Madhwal Bowling
Akash Madhwal Bowlingtwitter

MI VS GT IPL 2023: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये हाय व्होल्टेज सामना पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघातील खेळाडूंनी जोरदार कामगिरी करत २७ धावांनी जोरदार विजय मिळवला. या सामन्यात सूर्यकुमार यादवने तुफानी शतकी खेळी केली.

या खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्स संघाने २१८ धावांचा डोंगर उभारला होता. या धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्स संघाला ८ गडी बाद १९१ धावा करता आल्या. दरम्यान दुसऱ्या डावात आकाश मधवालने शुभमन गिलला एक भन्नाट चेंडू टाकला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Akash Madhwal Bowling
Suryakumar Yadav Memes: 'तुमचा नादच लई डेंजर,आमचा सूर्या हो गेम चेंजर' तुफानी खेळीनंतर सोशल मीडियावर भन्नाट memes व्हायरल

मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणाऱ्या नवख्या आकाश मधवालने आपल्या अप्रतिम गोलंदाजीने सर्वांची मनं जिंकली आहेत. त्याने या सामन्यात ४ षटक गोलंदाजी ३१ धावा खर्च करत ४ बाद केले. मुंबईच्या विजयात त्याने मोलाचं योगदान दिलं आहे. दरम्यान त्याने घेतलेली शुभमन गिलची विकेट सध्या चर्चेचा विषय ठरतेय.

मुंबई इंडियन्स संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना, गुजरात टायटन्स संघाला आक्रमक सुरुवातीची गरज होती. गुजरातने अशीच काहीसी सुरुवात केली. दरम्यान मुंबई इंडियन्स संघाकडून चौथे षटक टाकण्यासाठी आकाश मधवाल गोलंदाजीला आला होता.

Akash Madhwal Bowling
Suryakumar Yadav Six: सूर्यकुमारचा 'नटराज' स्टाईल षटकार पाहताच क्रिकेटचा देव प्रसन्न! दिली अशी प्रतिक्रिया

त्यावेळी गुजरातची धावसंख्या २ गडी बाद २६ अशी होती.गुजरात टायटन्स संघाकडून शुभमन गिल आणि विजय शंकरची जोडी विजयाच्या दिशेने आगेकूच करण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी चौथ्या षटकातील पाचवा चेंडू आकाश मधवालने भन्नाट गतीने टाकला जो शुभमन गिलला कळालाच नाही.

गिलने या चेंडूवर पूल शॉट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा हा प्रयत्न फसला. कारण गतीचा अंदाज न आल्याने चेंडू हुकला आणि थेट यष्टीला जाऊन धडकला.

ओव्हर द विकेटचा मारा करत असलेल्या आकाश मधवालचा चेंडू टप्पा पडून आता आला आणि गिलची दांडी गुल करून गेला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Latest sports updates)

या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबई इंडियन्स संघाकडून प्रथम फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवने ४९ चेंडूंचा सामना करत सर्वाधिक १०३ धावांची खेळी केली.

तर सलामीला आलेल्या ईशान किशनने ३१, विष्णू विनोदने ३० आणि रोहित शर्माने २९ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्स संघाने २० षटक अखेर ५ गडी बाद २१८ धावा केल्या होत्या.

या धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्स संघाकडून राशिद खानने अप्रतिम फलंदाजी करत ७९ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने ३ चौकार आणि १० षटकार मारले. तर डेव्हिड मिलरने ४१ धावांचे योगदान दिले.

विजय शंकरने २९ धावांची खेळी केली. मात्र गुजरातचा संघ विजयापासून २७ धावा दूर राहिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com