Shani Dev Rashi:'या' दोन राशींवर शनिदेव असतात नेहमी खूश; दूर करतात सर्व अडचणी

Shani dev : शनिदेव आपल्याला आशीर्वाद आणि दंड देखील देत असतात. शनिदेवाचा आशीर्वाद जितका लाभकारी असतो,त्याचप्रमाणे त्यांची वक्रदृष्टी आपल्याला अडचण देणारी असते. परंतु शनिदेव बारा राशींमधील दोन राशींवर नेहमी आनंदी राहत असतात.
Shani Dev Rashi
Shani Dev RashiSaam Tv

Shani dev Blessings To Two Zodiac Signs :

वैदिक ज्योतिषशास्त्रात शनिदेव कर्मानुसार फळ देत असतात. शनिदेव व्यक्तींना त्यांच्या कर्मानुसार फळ देत असतात. ज्या लोकांवर शनिदेवाची वक्रदृष्टी पडत असते, त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यामुळे प्रत्येक व्यक्ती शनिदेवाच्या वक्रदृष्टीपासून वाचवण्याचा प्रयत्न करत असते. मात्र शनिदेव नेहमीच दंड देत नाहीत. ज्या लोकांना शनिदेव आशीर्वाद देत असतात, ते राजासारखे जीवन जगतात.(Latest News)

शनिदेवाच्या कृपेने गरीब माणूसही राजा होऊ शकतो. दरम्यान ज्योतिष शास्त्रातील १२ राशींपैकी दोन राशींवर शनिदेवाची कृपा नेहमी राहत असते. शनिदेवाच्या कृपेने या दोन राशीच्या लोकांना त्यांच्या आयुष्यात कधीच कोणतीच समस्या येत नाही. शनिदेवाची सर्वात आवडत्या दोन राशी कोणत्या हे आज जाणून घेणार आहोत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मकर राशी

शनिदेव मकर राशीचा अधिपती ग्रह आहेत. मकर राशीच्या लोकांवर शनिदेव नेहमी कृपा ठेवतात. यामुळे मकर राशीच्या लोकांना कधीच आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत नाही. मकर राशीच्या लोकांची दु:खातून आणि अडचणीतून लवकर सुटका होत असते. शनिदेवाच्या कृपेने मकर राशीचे लोक भाग्यवान असतात. भाग्य त्यांना साथ देत असते. या राशीच्या लोकांचा स्वभाव अगदी साधा आणि सरळ असतो. मकर राशीच्या स्वभावामुळे शनिदेव त्यांच्यावर प्रसन्न असतात.

कुंभ

वैदिक ज्योतिषानुसार शनिदेव कुंभ राशीचाही अधिपती ग्रह आहे. कुंभ राशीच्या लोकांवर शनिदेव नेहमी कृपा करतात. कुंभ राशीच्या लोकांच्या स्वभाव अगदी साधा असतो. या कारणांमुळे शनिदेव त्यांना विशेष आशीर्वाद देत असतात. कुंभ राशीचे लोक नेहमी इतरांना मदत करण्यास तयार असतात. पैशाच्या बाबतीतही ते भाग्यवान असतात.

डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे आणि केवळ माहितीसाठी दिली जात आहे. साम टीव्ही याला दुजोरा देत नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com