आंदोलन पुढे ढकलण्याची विनंती संभाजीराजेंना करणार - विखे पाटील

Sambhaji Raje - Radhakrishna Vikhe
Sambhaji Raje - Radhakrishna Vikhe

नाशिक : मराठा आरक्षणाच्या Maratha Reservation मुद्यावरुन राज्यातील सर्व संघटनांना एकत्रित आण्यासाठी मी पुढाकार घेतोय. संभाजीराजे छत्रपतींनी Sambhajiraje  राज्यातील संघटनेच्या एकत्रित बैठकीला बोलवावं अशी मी विनंती करणार आहे. आंदोलन पुढे ढकलावं अशी विनंतही मी संभाजीराजेंना करणार आहे, असे भाजपचे BJP नेते राधाकृष्ण विखे पाटील Radhakrishna Vikhe यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. Will Request Sambhaji Raje to postpone Agitation on Maratha Reservation Say Radhakrishna Vikhe

मराठा आरक्षणाबाबत येत्या १६ जूनपासून आंदोलन करण्याचा इशारा विखे पाटील यांनी दिला आहे. याबाबत विखे पाटील म्हणाले, "संभाजी महाराजांना आंदोलन पुढे ढकलण्याची मी विनंती करणार आहे. आम्ही  सगळे एकत्र येऊन आठवड्या भरात बैठक घेऊ . मी आज किंवा उद्या संभाजी महाराजांशी बोलणार आहे. माझी भूमीका समन्वयाची आहे.  समाजाचा दबाव वाढला की नेते मंडळी पुढे येतील हा मला विश्वास आहे.''

हे देखिल पहा

विखे पाटील पुढे म्हणाले, "विनायक मेटे, संभाजी महाराज यांना देखील एकत्रित आणायचा माझा प्रयत्न आहे. राज्यात 23 संघटना काम करत आहेत मग भूमिका वेगळी का, असा माझा प्रश्न आहे. त्यामुळं सगळी ताकद एकत्रित आण्यासासाठी माझा प्रयत्न आहे. भाजपच्या वतीने मराठा आरक्षणा संदर्भात आम्ही बैठक घेतली. समाज बांधवांच्या भावना जाणून घेण्यासाठी बैठका घेतो आहे. राज्यभरातील समाजबांधवांना या बैठकीला बोलावण्यात आले होते. आंदोलनाच्या भविष्यातील रणनीती बाबत आम्ही चर्चा केली. लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे,'' Will Request Sambhaji Raje to postpone Agitation on Maratha Reservation Say Radhakrishna Vikhe

''सगळ्या संघटनेच्या नेत्यांनी एकत्र यावे असं मी आवाहन केलं होतं. लोणीला याबाबत बैठक झाली. सरकार समाजात फूट पाडून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहे . पदोन्नती आणि आरक्षणाच्या मुद्दयावर समाजातील नेत्यांनी तात्काळ राजीनामा द्यायला हवा आहे. आम्ही आधी सगळ्या संघटनांना एकत्र आणणार मग आमदार खासदारांना एकत्र आणणार आहोत," असेही विखे म्हणाले. 
Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com