सोलापूरचे थेंबभर पाणी घेणार नाही; इंदापूरलाही कमी पडू देणार नाही....(व्हिडिओ)

Datta Bharne
Datta Bharne
Published On

पुणे : सोलापूरचे Solapur एक थेंब पाणी घेणार नाही, मात्र इंदापूरला Indapur ही पाणी कमी पडू देणार नाही, असे जलसंधारण राज्यमंत्री तथा  सोलापूरचे पालकमंत्री आणि इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे Dattatray Bharne यांनी आज येथे ठामपणे सांगितले. सोलापूरकरांवर अन्याय झाला तर राजकारणातून Politics संन्याय घेईल, आमदारकीचा राजीनामा देईल अशी भूमीका भरणे यांनी यावेळी घेतली. 

आज उजनी धरणातील Ujani Dam पाच टीएमसी पाणी पळविल्याच्या मुद्द्यावरून पुण्यातील सिंचन भवनात बैठक आहे. भरणे यांच्या उपस्थितीत होत असलेल्या बैठकीला सिंचनचे अधिकारी आणि सोलापूरचे शिष्ट मंडळ उपस्थित राहणार आहेत. यावेळी बोलतांना भरणे यांनी या सगळ्या बाबत गैरसमज झाला असून तो दूर करण्यासाठी ही बैठक असून यामध्ये राजकारण होत असल्याचा आरोप केला. Will not take a Single drop of Water distributed to Solapur say Dattatray Bharne

सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि सोलापूरकरांमध्ये उजनी धरणातील पाणी पळविल्याच्या मुद्यावरून चांगलंच वातावरण तापलंय. सोलापूर जिल्ह्यातील पाच टीएमसी पाणी हे सांडपाण्याच्या नावाखाली इंदापूर येथील प्रकल्पाला वळविण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयावरून सोलापूर आणि पालकमंत्री भरणे यांच्यात मोठा संघर्ष सुरू झालाय. 

हा निर्णय रद्द करण्यासाठी विविध संघटनांसह स्थानिक शेतकऱ्यांनी याला विरोध दर्शविला असून विविध प्रकारची आंदोलने देखील केलीय. पाच टीएमसी पाणी इंदापूरला गेल्यास एक आवर्तन कमी होणार असल्याने जिल्ह्याचे नुकसान होत असल्यानं सोलापूरमध्ये संतापाची भावना पसरलीय.

गेल्या अनेक दिवसांपासून पालकमंत्री ते सोलापूरकर यांच्यातील हा वाद विकोपाला गेल्यानं आता त्यात थेट जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला. पुण्यातील सिंचनभवनात याबाबत मंत्री जयंत पाटील, दत्तात्रय भरणे आणि सोलापूरमधील शिष्ट मंडळ यांच्यात  बैठक होत आहे. या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागलं आहे. Will not take a Single drop of Water distributed to Solapur say Dattatray Bharne

दरम्यान,  उजनी रणातील पाणी प्रश्न सध्या चांगलंच पेटल्याच पहायला मिळतो आहे. काँग्रेस  प्रदेश कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे यांनी सोलापूरच्या हक्काचं उजनीच्या पाण्यासाठी 'प्राण जाए पर पाणी न जाए' असे दोन दिवसांपूर्वी सांगितले होते.
Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com