काँग्रेस नेते भाई जगताप यांच्यावर गुन्हा 

Bhai Jagtap
Bhai Jagtap
Published On

मुंबई : राज्यात Maharashtra अनेक ठिकाणी काँग्रेसतर्फे  पेट्रोल Petrol दरवाढी विरोधात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आली. काल गोरेगाव येथे पेट्रोल दरवाढी विरोधी गोरेगाव येथे काँग्रेस Congress आमदार तथा मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप Bhai Jagtap आणि काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करत होते. त्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Offence Registered against Congress Leader Bhai Jagtap

हे देखिल पहा

कोविड १९ मुळे जमाव बंदी असल्याने पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना आणि भाई जगताप यांना आंदोलन थांबावयला सांगितले. पण आंदोलन न थांबवता काँग्रेस कार्यकर्ते पोलिसांच्या अंगावर गेले एवढच नाही तर भाई जगताप यांनी वरीष्ठ पोलिस अधिका-याला बोट दाखवत त्यांच्या बाजूला असलेल्या एका वर्दीतील हवालदाराला थेट भाई जगताप यांनी ढकलले, असे पोलिसांचे म्हणणे आहे. 

हे पाहून काँग्रेस कार्यकर्ते अजून जोरात आरडा ओरडा करु लागले आणि पोलिसांच्या अंगावर जाऊ लागले हे पाहून शेवटी भाई जगताप यांनीच काँग्रेस कार्यकर्त्यांना मागे लोटले. आश्चर्य म्हणजे आंदोलनातील अनेकांनी मास्क घातला नव्हता आणि भाई जगताप यांनी देखील मास्क घातला नव्हता, असे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी भाई जगताप व गोरव राणे यांच्यासह ४० ते ५० कार्यकर्त्यावर गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Offence Registered against Congress Leader Bhai Jagtap
Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com