Gopichand Padalkar
Gopichand Padalkar

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आज घोंगडी बैठका...

Published on

पंढरपूर : राज्यातील महाविकास आघाडी Mahavikas Aghadi सरकार विरोधात आता पासून भाजपने BJP रान उठवण्यात सुरवात केली आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील  राष्ट्रवादीच्या NCP बालेकिल्ल्यातच भाजपने अधिक लक्ष  देण्यास सुरवात केली आहे. MLA Gopichand Padalkar Meeting today at Pandharpur

ही जबाबदारी भाजप आमदार गोपीचंद पडळकरांवर Gopichand Padalkar सोपवली आहे. आमदार पडळकर  आज  पंढरपुरातील प्रमुख दहा विविध समाजातील  लोकांशी संवाद साधणार आहेत. आज सकाळी आमदार पडळकर संत नामदेव पायरीचे दर्शन घेवून या नव्या मोहिमेची सुरवात करणार आहेत.

दिवसभर विविध मठांमध्ये जावून  घोंगडी बैठकांच्या माध्यमातून विविध जातीच्या आणि धर्माच्या लोकांशी ते संवाद साधणार आहेत. या दरम्यान गेल्या दोन वर्षातील  महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराचा लेखाजोखा मांडणार आहेत.  'साद बहुजनांच्या हक्कासाठी' या  अभिमानाची आज पंढरपुरातून सुरवात होणार असून पडळकरांच्या आजच्या  बैठकांकडे लक्ष लागले आहे. MLA Gopichand Padalkar Meeting today at Pandharpur

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com