भाजप नेता म्हणतो, पाच कोटी असेल तरच सभापतीसाठी लढा?

भाजप नेता म्हणतो, पाच कोटी असेल तरच सभापतीसाठी लढा?

नाशिक : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांत मतभेदाच्या बातम्यांना पाय फुटले आहेत. एका नेत्याने पाच कोटी असतील तरच सभापतीसाठी लढा असे चर्चेत सांगीतल्याचे बोलले जाते. त्यामुळे अहमदाबाद येथे सहलीला गेलेल्या सदस्यांमध्ये फूट पडल्याचे बोलले जाते.

स्थायी समिती सभापतिपदासाठी निवडणूक लढवायची असेल, तर पाच कोटी ज्याच्याकडे असेल त्यालाच उमेदवारी मिळेल, असा थेट प्रस्ताव सदस्यांना दिल्याने संतापात भर पडली. उमेदवारी देताना फक्त पैसा एवढीच गुणवत्ता आहे का, असा सवाल करताना महासभा, स्थायी समिती सभा, विधान परिषद, विधानसभा, लोकसभा तसेच पक्षाच्या एकाही कार्यक्रमात सहभागी न झालेल्या व्यक्तीला सभापतिपदासाठी उमेदवार म्हणून जाहीर केले जात असेल, तर सर्व तत्त्वनिष्ठेच्या फक्त गप्पा असल्याची भावना सदस्यांमध्ये निर्माण झाली आहे.

बोरा केंद्रस्थानी

भाजपशी कुठलाही संबंध नसताना माजी मंत्री गिरीश महाजन यांचे हस्तक म्हणून महापालिकेच्या कामकाजात हस्तक्षेप करणारे नीलेश बोरा नावाचे व्यक्ती भाजपमध्ये पुन्हा केंद्रस्थानी आले आहेत, असा आरोप होत आहे. अहमदाबाद येथे नगरसेवकांच्या हॉटेलमध्ये त्यांनी पोचण्याचा संबंध नसताना त्यांच्याकडून निर्णय प्रक्रियेत सहभाग घेतला जात असल्याची नगरसेवकांची तक्रार आहे. बोरा भाजपच्या शहराध्यक्षपदासाठी इच्छुक होते. महापालिकेत सत्ता आल्यापासून महापौरांच्या रामायण बंगल्यावर त्यांचा कायम वावर वादाचा विषय ठरला आहे. महापालिकेच्या काही कामांमध्ये ठेकेदार निश्‍चित करतानाही त्यांची भूमिका महत्त्वाची ठरत असल्याने आमदार, पक्षाचे वरिष्ठ नेत्यांना 'ओव्हरटेक' करून सत्तेच्या संदर्भातील निर्णय प्रक्रियेत बोरा यांचा वाढता हस्तक्षेप भाजपमधील खदखदीला कारणीभूत ठरत आहे.

Web Title BJP leader says, fight for president only if there are five crore?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com