सिडको अध्यक्षपदासाठी  माजी आमदार सुरेश लाड यांचे नाव चर्चेत

SURESH LAD
SURESH LAD
Published On

मुंबई : सिडको CIDCO हे राज्यातील एक श्रीमंत महामंडळ म्हणून ओळखले जाते. आंतरराष्ट्रीय विमानतळ Airport , नैना वसाहत, मेट्रो, उरण नेरुळ रेल्वे, जेएनपीटी विस्तार, स्मार्ट सिटी Smart City यांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याच्या कामी लागली आहे. त्यामुळे हे महामंडळ  राष्ट्रवादी NCP कडे जाणार असून  सिडको महामंडळाच्या अध्यक्ष पदासाठी माजी आमदार सुरेश लाड Suresh Lad यांच्या नांवावर एकमत होणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. Ex MLA Suresh Lad May be Appinted as CIDCO Chairman

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे माजी आमदार सुरेश लाड यांचे सबंध असल्याने त्यांच्या नियुक्त्याला विरोध नसल्याचे समजते. त्यामुळे   पनवेल आणि उरण नवी मुंबईत या भागात राष्ट्रवादीची ताकद नसल्याने माजी आमदार सुरेश लाड यांना सिडको अध्यक्ष करून त्या भागात पक्षाला ताकद देण्याची रणनीती आखली असून तसेच लाड यांच्या पक्ष संघटनेच्या  अनुभव लक्ष्यात घेता त्यांना जबाबदारी दिली जाणार आहे. 

हे देखिल पहा

माजी आमदार सुरेश लाड विरुद्ध आमदार  महेंद्र थोरवे असा राजकीय संघर्ष सध्या कर्जत मध्ये सुरू आहे. आमदार थोरवे यांनी रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्यावर सडकून टीका केली. त्यामुळे खासदार तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नोंद घेतल्याची समजते. त्यामुळे तटकरे आणि अजित पवार यांनी लाड राजकीय ताकद देण्याकरिता सिडको महामंडळावर वर्णी लागावी यासाठी जोरदार प्रत्यन करताना दिसून आहे

नवी मुंबई येथील सेनेचे नेते नामदेव भगत यांनी सिडको संचालक मिळण्याकरिता सेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी पक्ष प्रवेश केला त्यामुळे ते सुद्धा आपली वर्णी लागावी यासाठी जोरदार प्रयत्न दिसून येत आहे. Ex MLA Suresh Lad May be Appinted as CIDCO Chairman

तसेच  राष्ट्रवादीचे नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील हे सुद्धा सिडको अध्यक्ष पदांसाठी नांवाची चर्चा सुरू आहे. आगरी समाजाचे नेते तसेच गणेश नाईक यांना उत्तर देण्याकरिता त्यांची नांवाची चर्चा सध्या सुरू आहे येत्या 15 जून पर्यत महामंडळांच्या नियुक्त्या होणार असून महाविकास आघाडी सरकार भक्कमपणे आहे असा संदेश देण्याकरिता नियुक्त्या केल्या जाणार आहेत.
 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com