बेळगावमध्ये भाजपच्या मंगला अंगडींचा विजय

Mangala Angadi
Mangala Angadi
Published On

बेळगाव : भाजप उमेदवार मंगला अंगडी बेळगावच्या पहिल्या खासदार ठरल्या आहेत. आपले प्रतिस्पर्धी कॉंग्रेस उमेदवार सतीश जारकीहोळी यांचा सुमारे अंगडी यांनी तीन हजार मताधिक्यांनी पराभव करत अतितटीच्या लढतीत विजय मिळविला. यामुळे भाजपचा बालेकिल्ला शाबूत राहिला आहे. BJP Mangala Angadi Wins Belgaom Loksabha Bi Election

मंगला अंगडींना सुमारे ४ लाख ३५ हजारापेक्षा अधिक मते मिळाली आहेत. तर जारकीहोळी यांनी ४ लाख ३२ हजारापेक्षा अधिक मते घेतली आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांना सुमार सव्वा लाख मते मिळाली.

लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज (ता.२) मतमोजणी झाली. त्यात केपीसीसी कार्याध्यक्ष आणि कॉंग्रेस उमेदवार जारकीहोळी यांना ४ लाख ३२ हजार मते पडली. भाजप उमेदवार मंगला अंगडी यांना ४ लाख ३५ हजार मते पडली. BJP Mangala Angadi Wins Belgaom Loksabha Bi Election

पोस्टल मतदान मोजून मतमोजणीला प्रारंभ झाला यात अंगडी आघाडीवर होत्या. ३२ व्या फेरीपर्यंत त्या आघाडीवर होत्या. परंतु, त्यानंतर जारकीहोळी यांचे मताधिक्य वाढले.त्यानंतर सुमारे दहा ते बारा हजाराचे मताधिक्य त्यांनी कायम ठेवले होते. पण, यानंतर जारकीहोळी यांचे मताधिक्य घटू लागले. अखेरच्या क्षणाला अंगडी यांचे मताधिक्य वाढले. शेवटी अंगडी यांनी परत एकदा मतदार संघात कमळ फुलविले. 

काँग्रेस व भाजप या दोन राष्ट्रीय पक्षांच्या चुरशीच्या लढतीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनी कडवी झुंज दिली. त्यांना  १ लाख २२ हजार ६४२ मते मिळाली. शेळके यांच्यामुळेच या निवडणुकीत अधिक चुरस निर्माण झाली होती. BJP Mangala Angadi Wins Belgaom Loksabha Bi Election
Edited By - Amit Golwalkar
 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com