Rohini Khadse यांच्या फेसबुक प्रोफाईलची चर्चा, प्रोफाईलमधून वडिलांचा फोटो काढला! नव्या फोटोत कोण?

Rohini Khadse News: रोहिणी खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यांनी शरद पवारांच्या सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात राहण्याचा निर्णय जाहीर केला होता.

जळगाव : रोहिणी खडसे यांच्या फेसबुक प्रोफाईलची चर्चा रंगलीय. रोहित खडसे यांनी फेसबुकवर असलेल्या कव्हर फोटोतून एकनाथ खडसे यांचा फोटो हटवलाय. एकनाथ खडसे यांनी नुकताच भाजपसोबत जाण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर रोहिणी खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यांनी शरद पवारांच्या सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात राहण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर आता रोहिणी खडसे यांनी आपलं फेसबुक प्रोफाईलवरील फोटो अपडेट करत त्यातून एकनाथ खडसे यांना हटवल्याचं दिसून आलंय. रोहिणी खडसे यांनी वडील एकनाथ खडसे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी शरद पवार गटाचं महिला प्रदेशाध्यक्ष पदही देण्यात आलं होतं. दरम्यान, आता रोहिणी खडसे यांच्या फेसबुक प्रोफाईलवरील फोटोवरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com