Falgun Amavasya: फाल्गुन अमावस्येला करा 'हे' खास उपाय; पितृदोष, शनिदोषापासून मिळेल मुक्ती

Falgun Amavasya 2024 Upay: पितृदोषापासून मुक्तता मिळवण्यासाठी या अमावस्येला काही उपाय केले पाहिजेत. शनि दोष, पितृदोष किंवा कालसर्प दोषातून मुक्ती हवी असेल तर या अमावस्येला विधीवत पूजा केली पाहिजे.
Falgun Amavasy
Falgun AmavasySaam Tv
Published On

Falgun Amavasya 2024 Upay Pitra Dosh Kalsarp Shani Dosh Remedies:

आज फाल्गुन अमावस्या असून हिंदू कॅलेंडरनुसार या अमावस्याला खूप महत्त्व आहे. या महिन्यात येणाऱ्या अमावस्येला फाल्गुन अमावस्या म्हटले जाते. हा दिवस पितरांचे तर्पण आणि श्राद्ध करण्यासाठी शुभ आहे. या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान केल्याने शुभ फळ मिळते. जर तुमच्या कुंडलीत शनि दोष, पितृदोष किंवा कालसर्प दोष असेल तर तुम्ही फाल्गुन अमावस्येच्या दिवशी काही ज्योतिषीय उपाय करून त्यातून मुक्ती मिळवू शकतात. या उपायांचे पालन केल्याने आपल्याला फल प्राप्ती होते.(Latest News)

पंचांगानुसार, फाल्गुन अमावस्या ९ मार्च रोजी संध्याकाळी ६.१७ वाजेपासू सुरू झालीय. तर आज १० मार्च रोजी दुपारी २.२९ वाजता संपेल. उदयतिथीनुसार १० मार्चला फाल्गुन अमावस्या आहे. फाल्गुन अमावस्येला स्नान आणि दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी पहाटे ४.४९ ते ५.४८ वाजेच्या दरम्यान स्नान करावे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पितृ दोषापासून मुक्ती मिळवण्याचे उपाय

पिंपळाच्या झाडाची पूजा

पितृदोषापासून मुक्तता मिळवण्यासाठी फाल्गुन अमावस्येला पिंपळाच्या झाडाच्या मुळास जल अर्पण करावे. यासोबत दूध आणि पाच प्रकारची मिठाई अर्पण करावी. नंतर विष्णू देवाच्या नावाचा जाप करावा. एक पवित्र धागा अर्पण केल्यानंतर तुपाचा दिवा लावा. यानंतर ५, ७ परिक्रमा करावी.

पितरांना केशरयुक्त खीर अर्पण करा

फाल्गुन अमावस्येच्या दिवशी दक्षिणेकडे गवरी जाळून त्याच्या धुरामध्ये केशर टाकलेली खीर थोडी थोडी अर्पण करावी. आपल्या पूर्वजांचे ध्यान करत त्यांची क्षमा मागावी. यामुळे पितृदोषाचे दुष्परिणाम बऱ्याच प्रमाणात कमी होतात. फाल्गुन अमावस्येला स्नान करून पितरांचे ध्यान करून तर्पण व श्राद्ध करावे. यामुळे पितर खूप खुश होत असतात.

तसेच जर तुमच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल तर फाल्गुन अमावस्येच्या दिवशी भगवान शिवाची विधिवत पूजा करावी. यानंतर तांब्या किंवा चांदीच्या सापांची जोडी बनवून नदीत अर्पण करून द्यायची. फाल्गुन अमावस्येच्या दिवशी आपल्या लांबीइतके कच्चे सूत मोजावे. यानंतर हे सूत पिंपळाभोवती गुंडाळावे. असे केल्याने शनिदोषाचा अशुभ प्रभाव कमी होऊन नोकरी-व्यवसायात प्रगती होत असते.

डिसक्लेमर- या लेखात देण्यात आलेली माहितीची विश्वासार्हतेची हमी नाहीये. ही माहिती ज्योतिष, पंचांग, ​​श्रद्धा किंवा धार्मिक शास्त्रे अशा विविध माध्यमांतून संकलित करून लिहिण्यात आलीय. साम टीव्ही या सर्व गोष्टींशी सहमत नाहीये.

Falgun Amavasy
Rashi Guru: २०२४च्या शेवटपर्यंत 'या' ३ राशींवर राहील गुरुची कृपा; आर्थिक चणचण होणार दूर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com