Raver Lok Sabha: रक्षा खडसेंविरोधात मविआकडून कोण? Sharad Pawar गटाचा उमेदवार ठरला- सूत्र

Raver Lok Sabha Election 2024 News Today: एकनाथ खडसे यांनी माघार घेतल्यानंतर आता रावेरमधून शरद पवार गट कुणाला उमेदवारी देणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं. याचबाबत महत्त्वाची अपडेट समोर आलीय.

जळगाव : एकनाथ खडसे (Eknath Khadse News) यांनी माघार घेतल्यानंतर आता रावेरमधून शरद पवार (Sharad Pawar) गट कुणाला उमेदवारी देणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं. याचबाबत महत्त्वाची अपडेट समोर आलीय. शरद पवार यांच्याकडून रवींद्र भैय्या पाटील (Ravindra Bhaiya Patil) यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या नावावर लवकरच शरद पवार गटाकडून शिक्कामोर्तब केलं जाऊ शकतं, असं सांगितलं जातंय. रावेरमधून भाजपने एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे यांना तिसऱ्यांना उमेदवारी दिलीय. त्यानंतर खरंतर सून विरुद्ध सासरे असा सामना रावेरमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण खडसेंनी नुकताच भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय झाल्याचं स्पष्ट केल्यानंतर शरद पवार गट कुणाला रावेरमधून उमेदवारी देणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. त्यातच आता शरद पवार गटाकडून रवींद्र भैय्या पाटील यांचं नाव समोर आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com