वारकरी सेना म्हणते...तर 'माझी वारी, माझी जबाबदारी' ही भूमीका घेऊ

Warkari
Warkari

अमरावती : येत्या २० जुलै रोजी होणाऱ्या आषाढी एकादशीच्या Aashadhi Ekadashi सोहळ्यासाठी राज्यातील Maharashtra मानाच्या दहा महत्त्वाच्या पालख्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. या मानाच्या दहा पालख्यांमध्ये पादुका राज्य परिवहनच्या बसेसमधून पंढरपूर Pandharpur येथे नेण्यात येतील. यंदा पायी वारीला Wari परवानगी देण्यात आली नाही, तसेच पालख्यांसाठी वीस बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. Warkari Sena Opposing decision of Maharashtra Government about Cancellation of Pandharpur Wari

मात्र राज्य शासनाच्या या निर्णयाला अमरावती Amravati जिल्ह्यातील विश्व् वारकरी सेनेने विरोध दर्शविला असून किमान ४० पालख्यांना नियम व अटी लावून पंढरपूर येथे जाण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी पालकमंत्री यशोमती ठाकूर Yashomati Thakur यांच्याकडे करण्यात आली.

हे देखिल पहा

राज्य सरकारने वारकऱ्यांच्या भावनेचा विचार न करता केवळ दहा पालख्यांनाच परवानगी दिली आहे. राज्य सरकारचा हा निर्णय चुकीचा असून किमान ४० पालख्यांना नियम व अटी घालून वाहनाने पंढरपूर येथे जाण्यास परवानगी द्यावी. तसेच ज्ञानोबा आणि तुकोबा या दोन पालख्यांना पायी वारी करण्याची परवानगी राज्य शासनाने त्वरित द्यावी अशी मागणीही  वारकऱ्यांनी केली. Warkari Sena Opposing decision of Maharashtra Government about Cancellation of Pandharpur Wari

कोरोना महामारीमुळे मागील वर्षीपासून वारीसाठी प्रतिबंध घालण्यात आले आहेत. बसमधून केवळ मोजक्याच वारकऱ्यांना परवानगी देण्यात येत आहे. हा प्रकार अत्यंत चुकीचा असून प्रत्येक दिंडीत किमान १० वारकरी या प्रमाणे ४० पालख्याना शासनाने परवानगी द्यावी अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे. २४ जून पर्यंत शासनाने वारकऱ्यांच्या मागण्याचा गांभीर्याने विचार केला नाही तर, शासनाच्या 'माझा परिवार माझी जबाबदारी' या घोषणे प्रमाणे वारकरी देखील 'माझी वारी - माझी जबाबदारी' अशी भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाहीत, असे सांगण्यात आले आहे.Warkari Sena Opposing decision of Maharashtra Government about Cancellation of Pandharpur Wari

प्रसंगी कायदा हातात घेण्याची वेळ आली तर तो देखील घेऊ मात्र वारीला जाऊ त्यानंतर जे परिणाम दिसतील त्या सर्वस्वी राज्य शासन जबाबदार राहील अशी भूमिका वारकऱ्यांनी घेतली आहे. एकीकडे कोरोनाचा धोका आणि दुसरीकडे वारकऱ्यांनी घेतलेली भूमिका यातून आता शासन काय निर्णय घेतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com