स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरनं महाविकास आघाडीला चक्रव्युहात पकडण्याची खेळी भाजपनं केलीय. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतीदिनी त्यांच्या गौरवाचा प्रस्ताव सादर करण्यावरून विधानसभेत जोरदार गदारोळ झाला. सावरकरांच्या गौरव प्रस्तावाची मागणी भाजपानं लावून धरली, मात्र या मागणीला विधानसभाध्यक्ष नाना पटोलेंनी दाद दिली नाही.
सावरकरांचा गौरव प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. हा प्रस्ताव फेटाळल्यानं नाराज झालेल्या भाजपा आमदारांनी गोंधळ घालत सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.
नाना पटोलेंनी जरी सावरकरांचा गौरव प्रस्ताव फेटाळून लावला असला तरी दुसरीकडे सावरकरांचं योगदान कुणीही नाकारू शकत नाही अशी भूमिका अजित पवारांनी घेतली.
सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत समन्वय नाही, किंबहुना मतभेदच आहेत. शिवसेना सावरकरवादी आहेच, काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांचाही सावरकरांना भारतरत्न द्यायला विरोध नाहीये. त्यामुळे याचाच फायदा उचलत सावरकरांच्या मुद्द्यावरुन अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपनं महाविकास आघाडी सरकारला चक्रव्युहात अडकवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.
WebTittle :: VIDEO | From Savarkar's point in the Assembly
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.