वृत्तसंस्था : उल्हासनगरमधील Ulhasnagar धोकादायक इमारतींचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्या अधिकृत करण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यात यावा, या मागणीसाठी माजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी भाजपच्या BJP शिष्टमंडळासोबत पालिका आयुक्त राजा दयानिधी यांची भेट घेतली. याबाबत स्वतः रवींद्र चव्हाण यांनी माहिती दिली आहे. (Municipal Corporation should bear the cost of structural audit of dangerous buildings in Ulhasnagar: Ravindra Chavan)
गेल्या २० दिवसांत २ इमारती कोसळल्या असून त्यात १२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण बेघर झाले आहेत. या दुर्घटनांमुळे पुन्हा एकदा धोकादायक इमारती व अनधिकृत बांधकामांचा विषय ऐरणीवर आला आहे. यामुळे शहरातील धोकादायक इमारतीचे स्टक्चरल ऑडिट होणे अतिशय गरजेचे आहे. अखेर मनपाने सर्व इमारतीचे स्टक्चरल ऑडिट करण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत. यामुळे ह्या इमारतींमध्ये राहणाऱ्या सदानिकाधारकांचे धाबे दणाणले आहेत.
हाच विषय धरून भाजपचे माजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार कुमार आयलानी, आदींच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त राजा दयानिधी यांची भेट घेतली. यावेळी धोकादायक इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा खर्च पालिकेने उचलावा,अशी मागणी यावेळी केल्याचं माजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी म्हटलं.
रेडिरेकनर Redireckner चा मिळणाऱ्या निधीचा वापर करून किंवा धोकादायक इमारतीत राहणाऱ्याना मदत निधी उभा करून भाडे तत्वावरील घरात विस्थापित करण्याबाबत धोरण ठरविणे, मालकीच्या चार प्लॉटवर हाऊसिंग स्कीम बनवून विस्थापितांसाठी सदनिका उपलब्ध करून देणे किंवा रेंटल घरे महापालिकेने उपलब्द करून द्यावी अश्या अनेक विषयांवर चर्चा झाली असल्याची माहिती राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.
Edited By - Anuradha Dhawade
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.