VIDEO| फास्टॅगची डबलफास्ट फसवणूक?

VIDEO| फास्टॅगची डबलफास्ट फसवणूक?

मोठमोठे ढोल पिटून सुरू केलेल्या फास्टॅग योजनेतल्या अनेक त्रुटी आता समोर येऊ लागल्यात..वाहनचालकांनी तर फास्टॅग ही योजना म्हणजे आमच्या खिशात थेट हात घालणारी योजना असल्याचे आरोप सुरू केलेत..
त्यातच आता वाहनचालक एका नव्या प्रकारानं वैतागलेत..टोलनाक्यावर 12 तासांत पुन्हा आल्यास टोलमधून सवलत मिळते..मात्र, फास्टॅगमध्ये ही सवलतच मिळत नसल्याचा आरोप आता वाहनचालक करतायत..इतकंच नाही तर याबाबतची तक्रार करायची तरी कुठे हा प्रश्न त्यांना पडलाय...


एखाद्या टोलनाक्यावर 12 तासांत जर आपण पुन्हा येणार असू तर रिटर्न प्रवासाचा टोल भरता येतो..त्यात दोन वेळचा टोल भरण्याऐवजी काही प्रमाणात सवलत मिळते..मात्र, फास्टॅग लावलेल्या वाहनानं 12 तासांत पुन्हा त्या टोलनाक्यावरून प्रवास केला तर त्याला ही सवलत मिळत नाही..

वाहनचालकांचा टोलनाक्यावरचा वेळ वाचावा, यासाठी फास्टॅग योजना आणलीय..मात्र, तिथंही ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार असेल तर या योजनेचा उपयोग काय, असाच सवाल वाहनचालक करतायत..

WebTittle ::  Fraude on double  fastatag  

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com