मुंबई - मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल बंद केली जाणार का, असा प्रश्न सध्या प्रत्येकजण विचारतो आहे. कोरोनामुळे मुंबईची लोकल आणि बससेवा बंद करण्याबाबत सरकारचा विचार सुरु आहे. तसे संकेतही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी हा निर्णय नाईलाजाने घ्यावा लागेल, असं राजेश टोपे यांनी म्हटलंय.
जर येत्या दोन दिवसांत गर्दी कमी झाली नाही, तर लोकल बंद करण्याचा निर्णय नाईलाजाने घ्यावा लागेल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. गर्दीमुळे कोरोना व्हायरल वेगानं पसरतो. मुंबईच्या लोकलमधील गर्दी पाहता, एक जरी कोरोनाची लागण झालेला रुग्ण लोकल किंवा बसने गेला, तर भयंकर परिस्थिती मुंबई आणि शहरात तयार होण्याची भीती व्यक्त केली जाते. त्यामुळे येत्या 48 तासांत याबाबतचा मोठा निर्णय राज्य सरकारकडून घेतला जाण्याची शक्यता आहे.
Facebook -
सध्या मुंबईच्या लोकलमधून प्रवासी तोंडाला रुमाल आणि मास्क लावून प्रवास करताना पाहायला मिळत आहेत. मात्र अशाही परिस्थिती कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारी घेण्याची गरज व्यक्त केली जाते आहे. आज कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. तीन रुग्ण नव्याने आढळून आले असून 5 जणांना बरं करण्यात यश आलं आहे. त्यामुळे येत्या काळात सार्वजनिक वाहतूक असलेल्या मुंबईच्या लोकलसेवा आणि बेस्ट बस सेवेबाबत मोठा निर्णय घेतला जाण्याची मोठी शक्यता वर्तवली जाते आहे. कोरोनामुळे आतापर्यंत भारतात 5 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
राज्यात 10 मार्चपासून कशा पद्धतीनंन रुग्ण वाढत गेले?
10 मार्च - 2
13 मार्च - 11
14 मार्च - 19
15 मार्च - 31
16 मार्च - 33
17 मार्च - 39
18 मार्च - 42
19 मार्च - 49
20 मार्च - 52 (सकाळी 11 वाजेपर्यंत)
मुंबई लोकलनं दररोज सरासरी 71 लाख प्रवासी प्रवास करतात. एका लोकलमध्ये जवळपास 3 ते 4 हजार प्रवासी असतात..एका डब्यात किमान 150 ते 200 प्रवासी प्रवास करतात.
लोकल बंदबाबत मुंबईकरांना काय वाटतंय? पाहा व्हिडीओ -
covid 19 corona virus mumbai local may lock down maharashtra
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.