बदलापूर : बदलापूर एमआयडीसीत MIDC आज रात्रीच्या सुमारास रासायनिक Chemical कंपनीत Company गॅस Gas गळती झाली. यामुळे शिरगाव, आपटेवाडी भागात अनेक लोकांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्यानं मोठी घबराट पसरली होती. Chemical Gas Leak At Badlapur MIDC
बदलापूर एमआयडीसीत नोबेल इंटरमिडीएट्स नावाची रासायनिक कंपनी आहे. या कंपनीतील रिऍक्टरमध्ये आज रात्री ही गॅस गळती झाली. या रिऍक्टरमध्ये सल्फ्यूरीक ऍसिड आणि मिथाईल बेंझाईन एकत्र केलं जात होतं.
मात्र यात सल्फ्यूरीक ऍसिड जास्त पडल्यानं अचानक रिऍक्टरमधून गॅस लिक Leak झाला आणि परिसरात पसरला. हा गॅस ज्वलनशील नसला, तरी त्यामुळे परिसरातल्या लोकांना श्वास घ्यायला त्रास होणे, डोळे जळजळणे असे त्रास होऊ लागले. Chemical Gas Leak At Badlapur MIDC
हे देखील पहा -
याबाबतची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत ही गळती रोखली. तसंच रिऍक्टरचं कुलिंग ऑपरेशन केले. या घटनेत कुणालाही इजा झालेली नसून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी भागवत सोनोने यांनी दिली आहे.
रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आली. मात्र मात्र एवढी मोठी घटना घडली असतानाही प्रदूषण नियंत्रण मंडळाचा एकही कर्मचारी घटनास्थळी पोहोचला नाही. या भागात वारंवार गॅस गळतीचे घटना घडत असून प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांचा केला आहे. Chemical Gas Leak At Badlapur MIDC
Edited By : Krushnarav Sathe
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.