
स्टेट बँकेत नोकरीची संधी
स्टेट बँकेत क्रेडिट ऑफिसर पदासाठी भरती
पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या
स्टेट बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यास सांगितले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने याबाबत जाहिरात प्रकाशित केली आहे.
चांगल्या सरकारी बँकेत नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. स्टेट बँकेतील स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठीची शैक्षणिक पात्रता याबाबत सविस्तर माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. १२२ रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी ६४,८२० रुपये पगार मिळणार आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाने व्यवस्थापक (प्रोडक्ट-डिजिटल प्लॅटफॉर्म), उपव्यवस्थापक, व्यवस्थापक (क्रेडिट विश्लेषक)या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
व्यवस्थापक पदासाठी उमेदवारांनी आयटी/कॉम्प्युटर / कॉम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रिकल / इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन बी.ई /बी.टेक किंवा मास्टर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन (एमसीए), एमबीए केलेले असावे.
उपव्यवस्थापक पदासाठी आयटी/ कॉम्प्युटर / कॉम्प्युटर सायन्स / इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल / इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन बी.ई/ बी.टेक किंवा एमसीए किंका एमबीए केलेले असावे. क्रेडिट मॅनेजर पदासाठी कोणत्याही शाखेतूप पदवीधर असावे. याचसोबत एमबीए/ पीजीडीबीए / पीजीडीबीएम / एमएमएस / सीए/ सीएफए पदवी प्राप्त केलेली असावी.
या नोकरीसाठी संपूर्ण भारतात भरती केली जाणार आहे. तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जायचे आहे. त्यानंतर करंट ओपनिंगवर क्लिक करा. यानंतर फॉर्म भरुन शुल्क जमा करा. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २ ऑक्टोबर २०२५ आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.