FDA Bharti
FDA BhartiSaam Tv

FDA Bharti: महाराष्ट्राच्या शासनाच्या 'या' विभागात सुरु आहे भरती; मिळणार १,२२,८०० पगार; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Food And Drug Department Job: महाराष्ट्र राज्याच्या अन्न आणि औषधे विभागात भरती सुरु आहे. रसायन शास्त्रज्ञ आणि वरिष्ठ टेक्निकल असिस्टंट पदासाठी भरती करण्यात येणार आहे.
Published on

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागात सध्या नोकरीची सुवर्णसंधी आहे. अन्न व औषध प्रशासन विभागात ५६ जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागात नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ ऑक्टोबर २०२४ आहे. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक म्हणजेच सिनियर टेक्निकल असिस्टंट पदासाठी ही भरती केली जाणार आहे. त्याचसोबत अॅनालिटिकल केमिस्ट पदासाठी ही भरती केली जाणार आहे.

FDA Bharti
Govt Jobs : कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; तब्बल ३०० पदांसाठी भरती; पात्रता आणि अटी काय? वाचा

विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ (Analytical Chemist) पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून केमिस्ट्री आणि बायो केमिस्ट्री विषयात पदवीधर किंवा त्यासंबंधित शिक्षण घेतलेले असावे. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान विषयासह पदवीधर किंवा फार्मसीमध्ये पदवीधर असणे गरजेचे आहे.

महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध विभागातील या नोकरीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १००० रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ९०० रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे.

FDA Bharti
EXIM Bank Job: EXIM बँकेत ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी; मिळणार भरघोस पगार; अशा पद्धतीने करा अर्ज

या नोकरीसाठी १८ ते ३८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २३ सप्टेंबरपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ ऑक्टोबर २०२४ आहे.fdamfg.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जाऊन तुम्ही अर्ज करु शकतात.

FDA Bharti
Bharat Petroleum Job: 'बीपीसीएल'मध्ये नोकर भरती; इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना मोठी संधी, पात्रता काय? पगार किती? जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com