Job Alert: BSF मध्ये 10 वी पास विद्यार्थ्यांना नोकरीची संधी 2788 जागांसाठी होणार भरती

नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची एक चांगली संधी आहे. कारण लवकरच सीमा सुरक्षा दल BSF मध्ये दहावी पास असणाऱ्या उमेदवारांसाठीच्या काही जागा भरल्या जाणार आहेत.
Job Alert: BSF मध्ये 10 वी पास विद्यार्थ्यांना नोकरीची संधी 2788 जागांसाठी होणार भरती
Job Alert: BSF मध्ये 10 वी पास विद्यार्थ्यांना नोकरीची संधी 2788 जागांसाठी होणार भरतीSaam TV

नवी दिल्ली - 10 वी पास असणाऱ्यां आणि नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची एक चांगली संधी आहे. कारण लवकरच सीमा सुरक्षा दल (Border Security Force Recruitment) म्हणजेच BSF मध्ये दहावी पास असणाऱ्या उमेदवारांसाठीच्या काही जागा भरल्या जाणार असल्याची माहिती एका हिंदी संकेतस्थळाने दिले आहे.

याबाबतच नोटीफिकेशन जारी करण्यात आलं असून कान्स्टेबल ट्रेडमॅन पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. तसंच यासाठी दहावी पास विद्यार्थ्यांनी उमेदवारांनी rectt.bsf.gov.in या लिंकवरती ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत. तर या फॉर्म भरण्यासाठीची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०२२ ही आहे.

Job Alert: BSF मध्ये 10 वी पास विद्यार्थ्यांना नोकरीची संधी 2788 जागांसाठी होणार भरती
Saam Impact: अखेर MPSC ने 'त्या' परीक्षांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया केली स्थगित; पहा व्हिडीओ

कान्स्टेबल ट्रेडमॅन या पदांसाठी ही भरती होणार असून भरती एकूण २७८८ जागांसाठी असणार आहे. तर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी दहावी उत्तीर्ण असणं गरजेच आहे. तसंच या उमेदवारांना एक ते दोन वर्षाचा संबंधित ट्रेडमधील अनुभव असंण आवश्यक आहे. तसंच या ट्रेडमधील ITI पूर्ण केलं असणं आवश्यक असणारं आहे. या जॉबसाठी वयोमर्यादा 18 वर्षे ते 23 वर्षे या दरम्यान असणं आवश्यक आहे. तसंच या कान्स्टेबल ट्रेडमॅन पदासाठीचा पगार जवळपास २१,७०० ते ६९,१०० प्रतिमहिना असणार आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com