Saam Impact: अखेर MPSC ने 'त्या' परीक्षांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया केली स्थगित; पहा व्हिडीओ

MPSC चे परीक्षा अर्ज भरताना तांत्रिक अडचण आल्याने सर्व मुलं अडचणीत असताना साम टिव्हीने ही बातमी लावून धरली होती आणि या नंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सामच्या बातमीची दखल घेतली असून जोपर्यंत ही तांत्रिक अडचण दुर होत नाही तोपर्यंत ही मुदत पुढे ढकलली आहे.
Saam Impact: अखेर MPSC ने 'त्या' परीक्षांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया केली स्थगित; पहा व्हिडीओ
Saam Impact: अखेर MPSC ने 'त्या' परीक्षांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया केली स्थगित; पहा व्हिडीओSaamTv

मुंबई : MPSC च्या बेवसाईटवरती मुलांना गट क परिक्षा फॉर्म भरताना सतत तांत्रिक अडचणी येत आहेत आणि त्या जवळपास मागील आठवड्यापासून येत आहेत. याआधी देखील MPSC ने 9 जानेवारी हा तारीख फॉर्म भरण्यासाठी दिली होती त्यावेळी तांत्रिक अडचण आली म्हणून ही तारीख 11 नंतर 13 अशा तारखा देण्यात आल्या होत्या मात्र तरीही ती अडचण आयोगाने दुर केली नाही अखेर अर्ज भरण्यासाठी 17 तारीख देण्यात आली होती मात्र ती तारीख उद्याच असताना आजही तांत्रिक अडचण आल्याने सर्व मुलं अडचणीत असताना साम टिव्हीने ही बातमी लावून धरली होती आणि या नंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) सामच्या बातमीची दखल घेतली असून जोपर्यंत ही तांत्रिक अडचण दुर होत नाही तोपर्यंत ही मुदत पुढे ढकलली आहे.

महाराष्ट्र गट- क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 व जाहिरात क्रमांक 270/2021 दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षासांठी विद्यार्थी अर्ज भरणार होते मात्र यामध्ये सतत तांत्रिक अडचणी येत होत्या.

पहा व्हिडीओ -

दरम्यान MPSC ने त्यांच्या ट्विटरवरुन माहिती दिली आहे, प्रसिद्ध सर्व जाहिरातीस अनुसरून अर्ज भरण्याची प्रक्रिया स्थगित करण्यात येत आहे. तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर पुन्हा सूचना देण्यात येईल तसेच सर्व जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यास पुरेशी मुदत देण्यात येईल. असं ट्विट MPSC ने केलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com